वीज वितरण कंपनीचे अभियंते व कर्मचाऱ्यांना स्थानबद्ध करणार - शेतकरी संघटनेचा इशारा
लातूर/प्रतिनिधी:कोरोना महामारीच्या विळख्याने सामान्य जनता व शेतकरी त्रस्त असताना महावितरण कंपनीकडून शेतीपंपाचे कनेक्शन तोडले जात आहे.हा प्रकार थांबवावा अन्यथा वीजवितरण कंपनीचे अभियंते व कर्मचारी यांना स्थानबध्द करणार केले जाईल,असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.यासंदर्भात कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना ई मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.
जिल्ह्यात शेतीपंपाच्या वीजबील वसुलीसाठी वितरण कंपनी कडुन वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे.यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे पिकांना पाणी मिळाले तसेच उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली.मार्चअखेर तापमान वाढत आहे.पिकांना पाणी देऊन ते जगवण्याची धडपड शेतकरी करीत आहे.पण वीज तोडल्यामुळे पाणी देता येत नाही.
कोरोना महामारीच्या काळात सर्वच धंदे बंद पडले पण शेतीने देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला.तरीही शासनाचे हे धोरण अन्यायकारक आहे.
वीज कंपनी शेतीसाठी किती तास विजपुरवठा करणार व पुरविलेल्या विजेच्या दर्जाबाबत काहीच जबाबदारी घेत नाही.पण वीज तोडणीसाठी आग्रही असते.शेतीसाठी वीज बेभरवशाची आहे.
वीजबिलात लुट केली जात आहे.सरसकट १०० ते १२५ युनिटचे जादा बिल आकारले जात आहे.
शेतीपंपाला वीज पुरवली म्हणून अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी राज्यातील उद्योगाकडून क्रॉस
सबसिडी वसुल केली जात आहे.शेतकऱ्यांना जास्त हॉर्स पॉवरची बिले देऊन,वापर जास्त दाखवून,वीज वितरण कंपनीने सरकार व उद्योगाकडून जास्त सबसिडी वसुल केली,हे सिध्द झाले आहे.
शेतीला प्रत्यक्षात चारच तास विज मिळते.अशा स्थितीत
शेतकरी विजबिल कसे भरणार? पिकासाठी केलेला खर्चही शेतीतुन निघत नाही. शेतीमालाचे भाव काढताना उत्पादन खर्चात वीजबिल धरले जात नाही.
या बाबींचा विचार करता वीजबिल वसुली थांबवावी,शेतीपंपाचे कनेक्शन तोडण्याची मोहीम बंद करावी.तोडलेली वीज जोडून द्यावी अन्यथा रविवार दि.२१ मार्चपासून वसुली व वीज तोडण्यासाठी येणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांना स्थानबध्द केले जाइल.वसुली थांबेपर्यंत आंदोलन सुरुच राहील.जिथे कुठे हे अधिकारी व कर्मचारी सापडतील तेथेच त्यांना स्थानबद्ध केले जाईल,असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
कोरोना महामारीचे प्रतिबंधात्मक उपाय पाळत, सामाजिक अंतर ठेऊन स्थानबध्द करून घेराव घातला जाईल.आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी,
शेतकरी व महिला सहभागी होतील असेही या निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाविषयक निर्बंधांमुळे अधीक्षक अभियंत्यांना प्रत्यक्ष न भेटता ई मेलच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले.प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधवराव मल्लेशे यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन केले जात आहे.या निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.