भारतीय अर्थव्यवस्था सशक्त करण्यासाठी ऊर्जेची बचत अति आवश्यक - केदार खमितकर लामजना ता. औसा : गुरुवार

 भारतीय अर्थव्यवस्था सशक्त करण्यासाठी ऊर्जेची बचत अति आवश्यक - केदार खमितकर






लामजना ता. औसा : गुरुवार दि.4 मार्च रोजी जिल्हा परिषद प्रशाला येथे पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय भारत सरकार च्या वतीने इंधन संरक्षण सार्वजनिक जागरुकता वाढवण्यासाठी, इंधन कार्यक्षम साधनांचा प्रचार करण्यासाठी सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक श्री. आर. जी. पाटू होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच श्री. खंडेराव फुलारी होते. ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. ऊर्जा ही राष्ट्रीय संपत्ती आहे, राष्ट्राच्या उन्नती साठी संरक्षण करावे असे केदार खमितकर यांनी आपले मत व्यक्त केले.  
आपल्या भारत देशास ऊर्जाच्या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्याकरिता व प्रगतीशील बनविण्याकरिता भारतीय अर्थव्यवस्था सशक्त करण्यासाठी ऊर्जेची बचत अति आवश्यक आहे. मनुष्यप्राणी हा पाषाण युगापासून सतत ऊर्जेच्या शोधात आहे. प्रथमत: स्वत:च्या शारीरिक ऊर्जेचाच वापर करणारा हा सर्वसामान्य प्राणी, इतर जीवांप्रमाणे, तेवढ्यावर न थांबता सतत ऊर्जेच्या शोधात राहिला. शेती साठी बैलांची ऊर्जा, वाहतुकीसाठी घोड्यांची, खेचरांची, उंटांची ऊर्जा. अगदी टपालासाठी कबूतराच्या ऊर्जेचा वापर करायला शिकला. पण त्यानंतर चक्राचा, वाफेचा शोध लागला, तसे या नवीन प्रकारच्या ऊर्जाचा वापर करत त्यावर चालणाऱ्या यंत्रांना या मानवाने गुलाम केले. वाहतुकीपासून, उत्पादन, शेती सेवा क्षेत्रात या ऊर्जेचा वापर होत राहिला व मानवाची ऊर्जेची भूक सतत वाढत राहिली. आज कोणत्याही अर्थ व्यवस्थेच्या विकासाला जशी पैशाची गुंतवणूक आवश्यक असते तशीच अधिकाधिक ऊर्जेची आवश्यकता असते. ज्या देशात ऊर्जेचे व त्याच्या उपयोगाचे प्रमाण जास्त त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत साहजिकच भरीव चालना मिळते. विकसित व विकसनशील देशातील ऊर्जेच्या उत्पादनामध्ये व त्याच्या माणशी उपयोगामध्ये कमालीची तफावत आढळून येते. भारताची अर्थव्यवस्था जरी वार्षिक ८-९टक्क्यांनी वाढवायची असेल, तर भारतातील ऊर्जा उत्पादन व त्याचा उपयुक्त वापर याचे प्रमाण प्रकर्षाने वाढणे आत्यंतिक गरजेचे असल्याचे खमितकर यांनी सांगितले. कोळसा, नैसर्गिक वायू किंवा अणु इंधन यांचा पुरवठा हा अक्षय नाही, तर दिवसागणिक तो थोडा थोडा संपतो आहे. आयात महागडी होत चालली आहे. पर्यावरणाचा प्रश्न भविष्यात आ वासून उभा आहे आणि ऊर्जेला पर्याय नाही अशा परिस्थितीत  ऊर्जेच्या अपारंपरिक व अक्षय स्रोतांकडे वापर हाच एकमेव पर्याय असून  सूर्य व वारा याचा वापर करून ऊर्जा निर्माण करण्याची आज भारताला अशा ऊर्जास्रोत्रांकडे बघण्याची गरज आहे. यावरती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. आर. जी. पाटू यांनी प्रत्येक विद्यार्थ्याना प्रति दिनी एक युनिट बचत करून राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याकरिता आवाहन केले.यावेळी ऊर्जा बचतीची  मार्गदर्शिका प्रदान करण्यात आली. कार्यक्रमांत श्री. बालाजी राव पाटील उपसरपंच, श्री. विजय कुमार दंडगोले अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, श्री. पाटील ए. एल. शिक्षक इतर शिक्षकोत्तर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते. श्रीमती एम्. डी. माने मॅडम यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय इंधन संरक्षण प्रतिज्ञेने करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या