महानगरपालिकेत भाड्याने लावलेल्या वाहनात व वैद्यकीय अधिकारी नियुक्तीत झाला घोटाळा.
आर्थिक लूट करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आयुक्त अमन मित्तल यांची भेट घेऊन दिले निवेदन.
लातुर : दि. ५ - महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना वापरावयासाठी टेंडर काढून भाड्याने वाहने लावली आहेत. मात्र या वाहन विभागात होत असलेल्या सावळ्या गोंधळाची व अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या वाहनांच्या गैरवापराबद्दल पुराव्यासह संपूर्ण माहिती तसेच महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकाऱ्याचा नियमबाह्य दिलेला पदभार याविषयी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची भेट घेऊन चर्चा करून सदरील घोटाळ्याबाबत कार्यवाही करण्यासाठीचे निवेदन दिले.
महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर शासनाचे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे बीएएमएस असलेल्या डॉक्टरला पदभार दिलेला आहे. या पदावर नियुक्ती देण्यासाठी किमान एमबीबीएस असणे आवश्यक असताना बिएएमएस डॉक्टरची नियुक्ती कोणत्या नियमात केली ? असा प्रश्न लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आयुक्त अमन मित्तल यांना भेटून मांडला आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानचे अतिरिक्त अभियान संचालक यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये आयुक्तांना पत्र पाठवून बीएएमएस शैक्षणिक अर्हता असलेल्याना वैद्यकीय अधिकारी पदावर नेमता येणार नाही असे कळवून सुद्धा बिएएमएस डॉ. महेश पाटील यांची वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर बेकायदेशीर नेमणूक केली कशी ? डॉ. पाटील यांना वैद्यकिय अधिकारी पद देणारा महापालिकेतला भ्रष्टाचारी आहे तरी कोण ? आयुक्त अमन मित्तल यांनी वैद्यकीय अधिकारी पदावर असलेले डॉ. महेश पाटील एमबीबीएस आहेत काय ? याची खात्री करावी व बेकायदेशीर पणे झालेली नेमणूक तात्काळ रद्द करावी अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
डॉ. महेश पाटील कडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस हि वैद्यकीय पदवी नाही. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक असताना डॉ. पाटील यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणत्या कायद्या अंतर्गत नेमणूक केली ? असे अनेक प्रश्न पनाळे यांनी आयुक्ताकडे मांडुन वैद्यकीय अधिकारी पदभार तसेच भाड्याने लावलेल्या वाहन घोटाळ्याची चौकशी करून महानगरपालिकेची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.