रोटरीच्या स्थापना दिनानिमित्त गरजू महिलांना शिलाई मशीन भेट
लातूर/प्रतिनिधी:
रोटरी इंटरनॅशनलच्या स्थापना दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने दोन गरजू महिलांना शिलाई मशीन भेट देण्यात आल्या.
१९०५ साली स्थापन झालेल्या रोटरी इंटरनॅशनल च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याच अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउनने हा कार्यक्रम घेतला. सौ.उमा व्यास,सौ. कल्पना भट्टड,डॉ.सौ.जयंती आंबेगावकर,प्राजक्ता भोसले यांची यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती होती.
ज्या महिलांना शिलाई मशीनची अत्यंत गरज आहे अशा दोघींची निवड करून त्यांना या मशीन देण्यात आल्या.या माध्यमातून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यास त्यांना मदत होणार आहे.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष अनुप देवणीकर,सचिव रवींद्र बनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रोजेक्ट चेअरमन पवन मालपाणी यांनी देणगीदारांचे आभार मानले.या कार्यक्रमास माजी अध्यक्ष शशिकांत मोरलावार, डॉ.किरण दंडे,दिनेश सोनी यांच्यासह सर्व सदस्य आणि देणगीदारांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.