एम आय एम पक्षाच्यावतीने औशात रुग्णांना सुकामेवा बिस्किट वाटप !
औसा (प्रतिनिधी) एम आय एम पक्षाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वतीने काही नागरिकांना मास्क आणि औसा येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना खारीक, बदाम, काजू, तसेच बिस्किट वाटप करण्यात आले ६३ वर्षापूर्वी पक्षाची स्थापना झाल्याने आता सर्वत्र पक्ष संघटना बांधण्याचे कार्य सुरू असून या पक्षाच्या वतीने जनहितासाठी पक्षाचे कार्यकर्ते सतत कार्य करत असतात दिनांक २ मार्च २०२१ रोजी पक्षाचे औसा तालुका प्रभारी अफसर शेख,सिद्दिकी मुखित, मुक्तार चौधरी, शेख नजीर, शेख समद, सय्यद आलादिन, शेख बिलाल, शेख कलीम, शेख असलम, तसेच वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना या पक्षाच्या वतीने सुकामेवा व बिस्किट वाटप करून पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला !
औसा येथील कार्यक्रमाचे वृत्त कळताच जिल्हा अध्यक्ष ताहेर हुसेन यांनी औसा तालुका प्रभारी अफसर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.