हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा. 1 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त ,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*


*हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा. 1 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त ,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

लातूर प्रतिनिधी






हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा. 1 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त ,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*


                   या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारू ची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी दिलेले होते. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी,निलंगा श्री दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मौजे कोराळवाडी तालुका निलंगा येथील शेत शिवारामध्ये अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे इसमावर स्थानिक गुन्हे शाखा,लातूर आणि पोलीस ठाणे कासारशिरशी यांच्या संयुक्त पथकाने रविवारी छापामारी केली यामध्ये 5600 लिटर रसायन किंमत 1 लाख 89 हजार रुपये चे रसायन आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले,या कार्यवाहीत 

1) मधुकर लिंबाजी मेलगीरे

2 )हरिश्चंद्र लक्ष्मण रेवणे 

3 )युवराज श्रीपती रेवणे

4 )विठ्ठल लिंबाजी मेलगिरे

  सर्व राहणार कोराळवाडी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर अशा एकूण चार आरोपीवर पो.ठाणे कासारशिरशी येथे गुरंन 101/2021,गुरंन 102/2021,गुरंन 103/3021, गुरंन 104/2021 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

              वरील कामगिरीसाठी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रताप गरजे ,पोलीस अंमलदार अंगद कोतवाड ,राजेंद्र टेकाळे , रामहरी भोसले ,हरून लोहार, युसुफ शेख, खुर्रम काजी, यशपाल कांबळे ,सिद्धेश्वर जाधव ,सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे प्रमोद तरडे, नागनाथ जांभळे , अहमद खान तसेच पोलीस ठाणे कासारशिरशी येथील पोलीस अंमलदार गोरोबा घोरपडे भीमाशंकर भोसले विकास भोंग यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या