पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा सदस्य, शासकीय अधिकाऱयांची कोविड १९ प्रादुर्भाव आढावा बैठक संपन्न.

 

पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली

विधानसभा सदस्य, शासकीय अधिकाऱयांची

कोविड १९ प्रादुर्भाव आढावा बैठक संपन्न.








Ø अधिकचे बेड उपलब्ध होण्यासाठी खाजगी रूग्णालयांना हॉटेलशी सलग्न करण्याचा पर्याय अवलंबावा.

Ø शासकीय आणि खाजगी रूग्णालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत.

Ø बाधीत फ्रंट लाईन वर्कर्सच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी

Ø सुपरस्पेशालीटीमध्ये २५ टक्के इतर शासकीय आणि खाजगी रूग्णालयात १५ टक्के बेडला वेन्टिंलेटर अनिवार्य करावेत.

Ø जेथे ऑक्सिजन बेड असेल तेथे तशा रूग्णांना शिफट करण्याची व्यवस्था उभारावी.

Ø कोवीड केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्राची संख्या वाढवावी.

Ø मृत्युदर कमी राखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युध्द पातळीवर उभा करावी.

Ø लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी.

Ø जनतेमधील घबराहट टाळण्यासाठी मृत्यु संख्येचे विश्लेषन करावे.

Ø औदयोगिक क्षेत्रात टेस्टींग आणि व्हॅकसीनेशन व्यवस्था उभा कराव्यात.

Ø बैठकी नंतर चार दिवसात ॲक्शन टेकन अहवाल सादर करावा.

Ø बेड कोठे उपलब्ध आहे ते पाहून रूग्णांना तेथे पाठविण्याची व्यवस्था महापालीकेने करावी.

Ø शहरातील स्मशानभुमीत गॅसदाहीनीची व्यवस्था उभा करावी.

Ø भाजी मार्केट तातडीने स्थलांतर करावे.

Ø संस्थात्मक लसीकरणातुन या मोहिमेला गती दयावी.

लातूर प्रतिनिधी : १८ एप्रिल :

   राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी मागच्या आठ दिवसात लातूर शहर तसेच जिल्हयातील बहुतांश तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कोवीड१९ बांधीत रूग्णावरील उपचार आणी प्रादूर्भाव नियंत्रणसाठी शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपयायोजनांचा आढावा घेतला. त्यांनतर आज सोमवार दि.१९ एप्रिल रोजी सकाळी लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हयातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकाऱ्यांची आयोजित आढावा बैठकीत सोबत या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली.

   संकट गंभिर असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याने नमूद करून या प्रार्दूभावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उभारण्यापासून आगामी काळात किमान १५ दिवस मनुष्यबळ, ऑक्सिजन, औषधे या कोणत्याच गोष्टीचा तुटवडा भासणार नाही यांचे आताच नियोजन करून ठेवावे असे निर्देश बैठकी त्यांनी दरम्यान दिले आहेत.

    या आढावा बैठकीत पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकचे बेड उपलब्ध होण्यासाठी खाजगी रूग्णालयांना हॉटेलशी सलग्न करण्याचा पर्याय अवलंबावा, शासकीय आणि खाजगी रूग्णालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत, बाधीत फ्रंट लाईन वर्कर्सच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी, सुपरस्पेशालीटीमध्ये २५ टक्के इतर शासकीय आणि खाजगी रूग्णालयात १५ टक्के बेडला वेन्टिंलेटर अनिवार्य करावेत, जेथे ऑक्सिजन बेड असेल तेथे तशा रूग्णांना शिफट करण्याची व्यवस्था उभारावी, कोवीड केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्राची संख्या वाढवावी, मृत्युदर कमी राखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युध्द पातळीवर उभा करावी, लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी, जनतेमधील घबराहट टाळण्यासाठी मृत्यु संख्येचे विश्लेषन करावे, औदयोगिक क्षेत्रात टेस्टींग आणि व्हॅकसीनेशन व्यवस्था उभा कराव्यात, बैठकी नंतर चार दिवसात ॲक्शन टेकन अहवाल सादर करावा, बेड कोठे उपलब्ध आहे ते पाहून रूग्णांना तेथे पाठविण्याची व्यवस्था महापालीकेने करावी, शहरातील स्मशानभुमीत गॅसदाहीनीची व्यवस्था उभा करावी, भाजी मार्केट तातडीने स्थलांतर करावे, संस्थात्मक लसीकरणातुन या मोहिमेला गती दयावी असे आदी निर्देश यावेळी संबंधित अधिकारी यांना दिले आहेत.

    या बैठकीत बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर मधील बेड संख्या वाढविणे आवश्यक असून या साठी जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची गरज, १०० ऑक्सिजन मशीन, औषध साठा कमी पडत असल्याने औषध पुरवठा वाढवावा लागेल, उदगीर आणि जळकोट या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट उभारावा लागेल,हॉटस्पॉट असलेली जिल्ह्यातील गावे तसेच ज्या गावात मोठे आठवडी बाजार भारतात आशा गावात लसीकरण मोहिमेला प्राधान्य द्यावे आशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

   आमदार विक्रम काळे यांनी यावेळी बोलताना जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी मांडत, लॉकडाऊन काळात अत्यावश्यक मालाची खरेदी विक्री मुभा सकाळी केवळ ३ तास ठेवावी, कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलमध्ये रुग्ण बरे झाल्यास त्यांना तात्काळ डिस्चार्ज देऊन अन्य गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून दिला जावा यावर नियंत्रण कक्ष सुरू करावा, रुग्णवाहिका नियोजन करावे, मुंबई प्रमाणे लातूर शहरातील रुग्णांना हॉटेल मध्ये निवास, उपचार, भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा आयुक्तांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना त्यांनी केली.

  लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, लातूर ग्रामीण मतदार संघातील प्रत्येक गावात गाव तिथे लसीकरण केंद्र सुरू केले जावे, जिल्ह्यातील रुग्णालयात ग्रामीण भागातल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत ही गैरसोय दूर करण्यासाठी जेथे गरज आहे अशा ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, वसतिगृह ताब्यात घेऊन या ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिले जावे, घराजवळ शिक्षण शासनाकडून जसे मिळते तसे घराजवळ आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध करून दिले जावे, ग्रामीण भागातील गृह विलगिकरनमध्ये असलेली रुग्ण अनेकदा शेतात वास्तव्य करतात यासाठी रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा व्हावा, लसीकरण करताना एक गाव मोहीम हातात घेतल्यास त्या गावातील १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे असे सांगितले.

    यावेळी बोलताना जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड १९ प्रादुर्भाव दुपटीने वाढण्याचा कालावधी १५ दिवसावरून ८ दिवसावर आला असून परिस्थिती गंभीर आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे लागेल, जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात जेवढे ऑक्सिजन बेड आहेत त्या पैकी ८० टक्के ऑक्सिजन बेड आरक्षित करावे लागतील, लातूर आणि उदगीर साठी स्वतंत्र जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता, लातूर प्रमाणे उदगीर साठी हेल्पलाइन नंबर सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

   ग्रामीण भागातील प्रत्येक प्रार्थमिक आरोग्य केंद्रात ५ ऑक्सिजन बेड ठेवण्यासाठी काम सुरू केले असून जिल्ह्यातील लामजना व मुरुड येथील कोविड केअर सेंटर सुरू करीत असून जिल्हा परिषद प्रशासनाकडून एक डॅश बोर्ड तयार करण्यात आला आहे. लसीकरण करण्यासाठी ग्रामसेवक व सरपंच यांची मदत घेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी या आढावा बैठकीत दिली.

    यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, लॉकडाऊन काळात ६० ते ६५ टक्के पोलीस फोर्स तैनात केला असून येणाऱ्या काळात एन.सी.सी.कॅडेटला या काळात सामावून घेने, अँटी कोरोना फोर्स मध्ये कोविड१९ नियमावलीसह ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण व जन जागृतीचे काम करतील, जिल्ह्यातील ९०० होमगार्ड पैकी ५०० पोलीस दलाकडे कार्यरत आहेत. उर्वरित होमगार्डना आरोग्य कर्मचाऱ्‍यासोबत प्रशिक्षण देऊन या प्रादुर्भाव काळात त्यांचे सहकार्य मिळेल, अन्य नागरीका प्रमाणे पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी यांच्या नातेवाईकांकरीता बेड उपलब्ध होण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.

  शहरातील रुग्ण संख्या, मृत्यू दर, खाजगी रुग्णालयातील बेड उपलब्धता, कोविड केअर सेंटर मधील ऑक्सिजन बेड व्यवस्था, शववाहिका, मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिली.

   लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण बेड २२०० ऑक्सिजन बेड, २९२ व्हेंटिलेटर बेड असून लातूर जिल्ह्यात ऍक्टिव्ह केस १६८५० असून मृत्यू दर १.६९ तर कंटेन्मेंट झोन ७३७ आहेत. यासह लातूर जिल्ह्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड बाबत नागरिकांच्या तक्रारी, रेमडीसिविर इंजेक्शन बाबत माहिती आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी दिली.

   यावेळी बोलताना बाजार समितीचे सभापती ललितभाई शाह म्हणाले की, भाजीपाला मार्केट जनावरांच्या बाजारात स्थलांतरित करण्यात येणारी अडचण, भाजीपाला मार्केटमध्ये होलसेल आणि रिटेल एकत्र विक्रीसाठी बसत असल्याने ग्राहक गर्दी वाढत आहे. याकरिता भाजीपाला मार्केटमध्ये केवळ होलसेल विक्री व्हावी व रिटेल भाजीपाला ग्राहकांना विक्रीसाठी लातूर मनपाकडून व्यवस्था निर्माण करावी लागेल असे ते म्हणाले.

   यावेळी बैठकीत बोलताना ना. अमित देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यास अन्य तालुक्यात जेथे बेड असेल तेथे रुग्णांना उपचारासाठी पाठवावे, उदगीरमध्ये किमान ३० व्हेंटिलेटर बेड असावेत, यासोबतच हॉस्पिटल दर्जा असलेल्या तालुक्यातील रुग्णालयात किमान १५ टक्के व्हेंटिलेटर बेड असावेत, वैद्यकीय सेवा देण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्यास कंत्राटी तत्वावर अथवा सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सेवेत सामावून घ्यावेत, विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्थेत हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी तात्काळ कामाला लागावे, लसीकरण करताना लसीकरण केलेल्या प्रत्येकाची नोंद आरोग्य विभागाकडे असावी, शहरातल्या खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर असे ७०० बेड तात्काळ वाढवून घ्यावेत असे निर्देश ना. अमित विलासराव देशमुख यांनी या बैठकीत मनपा आयुक्तांना दिले.

 खाजगी रुग्णालयातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करीता किमान ५० ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड असावेत यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवावा, जिल्ह्यातील कोविड १९ रुग्णांचा वाढता मृत्युदर कमी करण्यासाठी मोनेटरिंग युनिट सुरू करून अधिक लक्ष केंद्रित करावे व मृत्युदर वर्गीकरण आणि कारणे याचे विश्लेषण जनतेपर्यंत जावे जेणेकरून नागरिकाना ही माहिती मिळेल, बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नियमावली नुसार शहरातील खाजगी रुग्णालयात उपलब्ध आरोग्य सेवा सुविधाचा एक विशेष ड्राइव्ह राबवावा, फ्रंट लाईन वर्कर साठी कोविड१९ उपचारा करीता स्वतंत्र विंग तयार करावी, लातूर भाजीपाला मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी होलसेल व रिटेल भाजीपाला विक्रेते यांच्या सोयीचा व गर्दी टळेल असा पर्यायी मार्ग लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती व मनपाने एकत्रित बसून चर्चेतून काढावा, जिल्ह्यातील तालुकास्तरीय आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटर साठी लागणारया किमान १५ दिवसाची आवश्यक बाबीची मागणी यादी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱयांनी सादर करावी, महात्मा फुले आरोग्य योजनेच्या विम्याचा कालावधीत बदल करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, एम.आय.डी.सी.मधील चालणाऱ्या सर्व उद्योग कारखाने यातील कामगारांची कोविड१९ चाचणी प्राधान्याने करून घ्यावी, लसीकरण करीता येणाऱ्या नागरिकांची देखील रॅपिड टेस्ट करावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

  या बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यानीही काही सुचना मांडल्या. जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ. संजय ढगे, डॉ. हरीदास यासह इतर वरीष्ठ अधिकारी होते.

----------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या