शासकीय कोरोना लसीकरण मोहिमेस
हरंगुळकरांचा 100 टक्के प्रतिसाद
लातूर,दि.10(जिमाका): कोरोनाविरुद्धच्या लढाईत शासन जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देत आहे. लसीकरणात देखील शासन विक्रमी पद्धतीने आणि पूर्ण क्षमतेने काम करत आहे. कोरोना रोखण्यासाठी शासनाने “मेरा मास्क मेरी जिम्मेदारी” यासारखी जनजागृती मोहिम राबवत आहे. कोरोना विषयक घ्यावयाच्या काळजीबाबत अशा मोहिमेतून जास्तीत जास्त जनजागृती होण्यासाठी जनतेच्या प्रतिसादाची गरज आहे. हे लक्षात घेऊन मा.पालकमंत्री व जिल्हाधिकारी डॉ.पृथ्वीराज बी.पी. यांच्या आवाहनाला लातूरतालुक्यातीलहरंगुळ (बु.) येथीलआरोग्यउपकेंद्रातपरिसरातील 45 वर्षाच्या पुढील वयाच्या 159 नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन लस घेऊन 100 टक्के प्रतिसाद दिला आहे.
उपकेंद्राचे डॉ. कुरेशी म्हणाले की, सकाळ पासूनच या उपकेंद्रामध्ये नागरिकांच्या रागा लागण्यास सुरुवात झाली होती. सकाळी 10 वाजता लस देण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम लोकमतचे हरंगुळ प्रतिनिधी श्री. बाळूबुध्दे यांना लसीकरणाचा डोस देऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अशोक रामलिंग माळगे आणि त्यांच्या आई शांता बाई रामलिंग माळगे यांनी कोराना प्रतिबंधात्मक लस घेतली. श्री. माळगे यांनी कोरोना सारख्या साथ रोगावर सर्वांनी जिद्दीने मुकाबला केला पाहिजे. शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या शासकीय कामात सहभागी असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी, डॉक्टर, परिचारिका अंगणवाडी व अशा कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
उप विभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वपनिल पवार, गटविकास अधिकारी शाम गोडभरले, निवासी नायब तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार श्री. एस. एस. उगिले, श्री. बेरोळे, सरपंच सुर्यंकात सुडे, ग्रामविकास अधिकारी ए.बी.चलमले यांनी भेट दिली.
वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद साळुंके, हरंगुळ (बु.) उपकेंद्राचे डॉ.अली कुरेशी, श्री.कांदे (एचए), जयश्री पाटील (एएनएम), मनीषा शिंदे श्री. शिवाजी शिवनगे, आशा कार्यकर्ती रेशम माळगे, बालीका कांबळे हरंगुळ (बु.)चे लोकमत प्रतिनिधी बाळू बुध्दे, माजी सरपंच राज कुंवर शेळके, डॉ.सुर्यकांत शिवनगे, शिवानंद पाटील, भानुदास शेळके, महादू येरमे हरि किसन सुरकुटे, लहु मद्दे यांच्या सह मोठ्या संख्येने लसीकरणासाठी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कोरोना पासून बचाव करण्यासाठी लस घेणे अतिशय गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस कशा प्रकारे कार्य करते आणि यामुळे कोरोना पासून होणारा मृत्यू कसा टाळता येतो. आपले कुटूंब आपली जबाबदारी लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन कोरोना रोगावर मात करता येते. अशीही माहिती उपकेंद्राचे डॉ. कुरेशी यांनी दिली. गेल्या शनिवारी (3 एप्रिल रोजी )कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. त्यावेळी 60 जणांना लसीकरण केले होते. ****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.