भारत विकास परिषदेच्या वतीने दोन ऑक्सिजन मशिनचे लोकार्पण
गरजूंना नाममात्र भाड्यात होणार उपलब्ध
गरजूंना नाममात्र भाड्यात होणार उपलब्ध
लातूर/प्रतिनिधी ः- सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या भारत विकास परिषदेच्या वतीने सध्याच्या कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन आणि बाधीतांना गरजेचे असणार्या दोन ऑक्सिजन मशिनचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. संतोष देशपांडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. सदर मशिन गरजू रुग्णांना नाममात्र भाड्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती परिषदेचे सचिव अमित कुलकर्णी, यांनी दिली आहे.
भारत विकास परिषद ही संपुर्ण देशभरात कार्यरत असणारी सामाजिक संघटना असून संघटनेच्या वतीने वेळोवेळी आवश्यक असणारे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यापुर्वीही भारत विकास परिषद लातूर शाखेच्या वतीने अनेक समाजपोयोगी उपक्रम राबविले असून याचा लाभ जिल्ह्यातील नागरीकांना झालेला आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून या संसर्गाने बाधीत होणार्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा वैद्यकीय क्षेत्रावर ताण पडू लागलेला असून अनेक रुग्णांची गैरसोय होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. या रुग्णांना आवश्यक असणारी ऑक्सिजन मशिनचे भारत विकास परिषदेच्या वतीने लोकार्पण करण्यात आलेले आहे.
परिषदेच्या वतीने दोन ऑक्सिजन मशिनचे लोकार्पण महापौर विक्रांत गोजमगुंडे व विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. संतोष देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक पुनीत पाटील, नगरसेविका सौ. वर्षा कुलकर्णी, विश्वास लातूरकर, भुषण दाते, भरत चेरेकर, प्रसाद कुलकर्णी, योगेश काळे, विजय जाधव, अमोल बनाळे, सुनिल पाटील यांच्यासह परिषदेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांची उपस्थिती होती. कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या ज्या रुग्णांना ऑक्सिजन मशिनची गरज असणार आहे त्यांना हे मशिन नाममात्र भाड्यात उपलब्ध करून देण्यात येणार असून याकरीता शैलेश कुलकर्णी (मो. 9422468388) व सुनिल पाटील (मो. 9423777365) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अमित कुलकर्णी यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.