औराद शहाजानी व शिरुर अनंतपाळच्या ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी 9 कोटी 24 लाखाच्या निधीस मंजूरी

 

औराद शहाजानी व शिरुर अनंतपाळच्या ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी 9 कोटी 24 लाखाच्या निधीस मंजूरी





आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश
निलंगा/प्रतिनिधी ः- निलंगा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या औराद शहाजानी व शिरुर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रलंबीत काम निधीअभावी रखडलेले होते. गत वर्षभरापासून कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन या ग्रामीण रुग्णालयांची उभारणी होऊन ही रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी खुली होणे अंत्यत गरजेचे होते. या प्रलंबीत कामाच्या निधीसाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी  पाठपुरावा केलेला होता. या पाठपुराव्यास अखेर यश आलेले असून औराद शहाजानी ग्रामीण रुग्णालयासाठी 3 कोटी 51 लाख 39 हजार 414 तर शिरुर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाकरीता 5 कोटी 72 लाख 76 हजार रुपये असा दोन्ही रुग्णालयासाठी मिळून एकुण 9 कोटी 24 लाख 15 हजार 414 रुपयांचा निधीस मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे या रुग्णालयाची कामे आता लवकरच सुरु होतील. सदर निधी मंजूर केल्याबद्दल आ. निलंगेकर यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
ग्रामीण भागातील जनतेकरीता दर्जेदार आरोग्य सुविधा प्राप्त होऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या भागांमध्ये शासनाच्या वतीने रुग्णालयांची उभारणी होणे अंत्यत आवश्यकता आहे. त्या अनुषंगानेच निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघात असलेल्या औराद शहाजानी व शिरुर अनंतपाळ या मोठ्या वस्तींच्या गावांमध्ये रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीकरीता आवश्यक असणार्‍या निधीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला होता. या प्रस्तावाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत व एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली होती. त्या अनुषंगाने हा निधी मिळावा याकरीता आ. निलंगेकरांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. मात्र गत वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागत असल्याने रुग्णालयाची उभारणी लवकरात लवकर होऊन ती रुग्णसेवेत चालू होणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊनच आ. निलंगेकरांनी तात्काळ उर्वरीत कामाच्या निधीसाठी आवश्यक असल्याने पाठपुरावा सुरु केलेला होता.
आ. निलंगेकर यांच्या पाठपुराव्यास यश आले असून शासनाने या दोन्ही रुग्णालयाच्या प्रलंबीत कामांसाठी निधीस मंजूरी दिली आहे. औराद शहाजानी ग्रामीण रुग्णालयासाठी 3 कोटी 51 लाख 39 हजार 414 तर शिरुर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाकरीता 5 कोटी 72 लाख 76 हजार रुपयांच्या निधीस मंजूरी मिळालेली आहे. या रुग्णालयांकरीता आवश्यक असणारा निधी मंजूर झाल्याने आता ही रुग्णालय अधिक गतीने उभारण्यात येऊन ती लवकरच रुग्णसेवेत लोकार्पण करण्यात येतील अशी माहिती आ. निलंगेकर यांनी दिली आहे. सदर निधी मंजूर केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत व एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आ. निलंगेकरांनी आभार व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या