सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीकडून आजतागायत ४० गावातील पात्र १२३५ लाभार्थीना घरपोच अर्ज वितरण

 

सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त

लातूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीकडून आजतागायत ४० गावातील पात्र १२३५ लाभार्थीना घरपोच अर्ज वितरण

चेअरमन प्रवीण हणमंतराव पाटील यांची माहिती

लातूर प्रतिनिधी : १० एप्रिल :
   लातुर तालुका संजय निराधार अनुदान योजना समिती कडून सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त लातूर तालुक्यातील वाडीतांडयासह सर्व गावातील पात्र लाभार्थी शोधून त्यांना योजनेचा अर्ज मोफतपणे घरपोच देण्याचे अभियान दि. ६ एप्रिल २०२१ ते १८ एप्रिल २०२१ पर्यंत राबविले जात आहे. या अभियाना अंतर्गत आतापर्यंत ४० गावातील १२३५ लाभार्थींना अर्ज देण्यात आले आहेत, अशी माहिती संजय गांधी निराधार योजना, लातूर (ग्रामीण)चे चेअरमन प्रविण हणमंतराव पाटील यांनी दिली आहे.

सलगरा (खु.) येथुन अभियानाचा शुभारंभ
  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हयातील तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितींच्या निवडी केल्यानंतर सर्वांना लातूर जिल्हयातील एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचीत राहू नये याकरीता प्रयत्न करावेत असे सांगितले होते. या अनुषंगाने पात्र लाभार्थींना मोफत अर्ज आणि गावपातळीवरील कार्यकर्त्याकडून पूढील प्रक्रीयेसाठी मार्गदर्शन केले जात आहे. या योजनेचा शुभारंभ लातूर तालुक्यातील सलगरा येथुन झाला.
   या अभियान शुभारंभ कार्यक्रमास ट्वेंटी १ शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, संजय गांधी निराधार योजना समितीचे चेअरमन प्रवीण पाटील, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हरिराम कुलकर्णी, विलास साखर कारखान्याचे संचालक दगडुसाहेब पडीले यांच्या उपस्थितीत झाला.
४० गावातील १२३५ पात्र लाभार्थीना घरपोच अर्ज वितरण
    आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसापासुन ते सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसापर्यंत चालणा-या दि. ६ एप्रिल २०२१ ते १८ एप्रिल २०२१ या अभियानाअंतर्गत आज पर्यंत ४० गावातील लाभार्थींना अर्ज देण्यात आले आहेत. यामध्ये सलगरा (खु.), सलगरा(बु.), दगडवाडी, मुशिराबाद, बोरी, बिंदगीहाळ, बोकनगाव, उमरगा, भाडगाव, भातांगळी, चिकलठाणा, बामणी, मळवटी, हणमंतवाडी, कासारगाव, कानडी बोरगाव, सेवादास नगर तांडा, रमजानपुर, भडी, भातखेडा, कोळपा, कासारखेडा, हरंगुळ (खु.), भुईसमुद्रगा, टाकळी (ब.), जेवळी,  नागझरी, गाधवड, तांदुळजा, पिंपळगाव, भोसा, निळकंठ, मसला, वांजरखेडा, वांजरखेडा तांडा, भिसे वाघोली, वाडी वाघोली, माटेफळ, टाकळगाव व सारसा या गावांचा समावेश आहे.यानंतर संबंधित गावातील परिसरातच "संजय गांधी योजना समाधान शिबीर"राबविण्यात येऊन वंचित निराधारांकडुन प्राप्त अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज जाग्यावरच ऑनलाईन भरुन घेऊन समितीच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल.यामुळे वंचित निराधारांना शासकीय योजनांचा लाभ देणे सुकर होईल अशी माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, तालुका लातूर (ग्रामीण)चे चेअरमन प्रवीण हणमंतराव पाटील यांनी दिली.
  विधायक उपक्रमाला अनेकांचा हात
    सदयाची कोवीड१९ ची परिस्थिती पाहता प्रादूर्भावाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून लातुर तालुका संजय निराधार अनुदान योजना समिती कडून पात्र लाभार्थीना शोधून अर्ज देण्यात येत आहेत. याकरीता तालुका पातळीवर पदाधिकारी, विविध संस्थामधील पदाधिकारी, गावपातळीवरील कार्यकर्ते मोलाचे सहकार्य करीत आहेत. खऱ्या अर्थाने ही योजना शेवटच्या पात्र लाभार्थी पर्यंत पोहोचविण्यासाठी अनेकजण सहकार्य करीत आहेत. या अभिनव उपक्रमामुळे अनेक गरजूना लाभ होत आहे. यामुळे आगळया वेगळया उपक्रमा बददल सर्वजन आनंद व्यक्त करीत आहेत.हे अभियान यशस्वी करण्यासाठी समितीचे चेअरमन प्रवीण पाटील यांच्यासह समितीचे सदस्य सर्वश्री अमोल देडे, सौ. शितल राजकुमार सुरवसे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, रमेश पाटील, आकाश कणसे संबंधित गावचे संजय गांधी समन्वयक , ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, तंटामुक्त समितीचे आजी माजी पदाधिकारी आदी परिश्रम घेत आहेत.
   सदर अभियानात लातुर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.स्वयंप्रभाताई पाटील, रेणा साखरचे संचालक संभाजी रेड्डी, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव बोळंगे, विलास साखरचे संचालक अमृत जाधव, विलास बॅंकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकते, इंदिरा सहकारी सुतगिरणीचे व्हाइस चेअरमन धनराज पाटील, पंचायत समितीचे सदस्य तथा लातूर ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णुदास शिंदे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक प्रताप शिंदे, विलास साखरचे संचालक अॅड. सुभाष माने, पंडित ढमाले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जगदीश बावणे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बंकट कदम व तज्ञ संचालक ज्ञानेश्वर भिसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
------------------------------------














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या