*ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्याला अटक, 11 लाखाचा मुद्देमाल हस्तगत*
*स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरणाऱ्या आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर हेड आणि ट्रॉली सहित गुन्हा करताना चोरट्यांनी वापरलेली एक स्कॉर्पिओ गाडी असा 11 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.*
लातूर प्रतिनिधी ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्याला अटक, 11 लाखाचा मुद्देमाल हस्तगत याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस ठाणे,उदगीर ग्रामीण हद्दी मधून ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी झाल्याची
तक्रार वरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 47/2021 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे निर्देशान्वये
पोलीस ठाणेचे व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पथके तयार करण्यात आले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे,झोला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे राहणारा श्रीहरी सुर्यकांत मुरकुटे,वय 41 वर्ष यास गंगाखेड ते पालम रोड वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर हेड व ट्रॉली सह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने इतर 03 साथीदाराचे सहायाने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले
गुन्ह्यात चोरलेला ट्रॅक्टर हेड-ट्रॉली व गुन्हा करते वेळी वापरलेली स्कार्पिओ गाडी पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केले आहे. पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी मध्ये पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिम्मत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी,उदगीर श्री.डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.भातलवंडे,पोलीस निरीक्षक श्री.वाघमारे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.संजय भोसले , पोलीस अमलदार श्री.सिद्धेश्वर जाधव श्री.सुधीर कोळसुरे,सायबर चे पोलीस अमलदार श्री.राजेश कंचे श्री.प्रदीप स्वामी श्री.रियाज सौदागर चालक श्री.नागनाथ जांभळे यांचा सहभाग होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.