कोरोणा संकटात वार्षीक 15 लाख उत्पन्‍न असणार्‍याला शासनाने मदत द्यावी

 

कोरोणा संकटात वार्षीक 15 लाख उत्पन्‍न असणार्‍याला शासनाने मदत द्यावी





लातूर दि.14-04-2021
देशामध्ये कोरोणावाढीचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये झाले असून या आजाराने भिषण परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. वाढत्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने अनेकदा संचारबंदी, लॉकडाऊन सर्वच ठिकाणी केले आहे. आणि आता कोरोणा नियंत्रणात आणण्यासाठी अधिक दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मागील वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये विविध शहरामध्ये ग्रामीण भागातून कामासाठी गेलेले मजूर नोकरदार काम बंद करून आपापल्या गावी परत आले होते. ते बरेचजण गावीच आहेत. जे थोडे परत गेले तेही लॉकडाऊनमुळे परत निघाले आहेत. अशा मजूर, नोकरदार लहाण उद्योजकांना ज्यांचे वार्षीक उत्पन्‍न 15 लाखाच्या आत आहे. अशा सर्वांना किमान पहिल्या टप्प्यात 25 हजार व दुसर्‍या टप्प्यात 25 हजार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपा नेते तथा मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
तेलंगणा सरकारने शेतकरी व सामान्यांना मदत दिली त्याप्रमाणे महाराष्ट्राने द्यावे
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांनी शेतकर्‍यांना दरवर्षी प्रत्येक एकराला 10 हजार, 50 एकर असल्यास 5 लाखाप्रमाणे अनुदान प्रत्येक शेतकर्‍याला देतात, याशिवाय कोरोणासाठी प्रत्येक रेशन कार्डला 3 हजार रूपये व 40 किलो. तांदुळ मोफत दिले आहे. व शेतकर्‍यांना कर्जमाफीही दिली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने त्वरीत आर्थिक अनुदान वाढवून द्यावे. अशी मागणी माजी आ.कव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या