औसा तालुक्यात कोवीड -19 लसीकरणास उत्स्फुर्त प्रतिसाद.
दिनाक 08/04/2021 रोजी औसा तालुक्यातील पाच उपकेंद्राच्या ठिकाणी कोवीड 19 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये उपकेंद्र कार्यक्षेत्रातील गावामध्ये 45 वर्ष वयोगटातील लाभार्यानी उत्स्फुर्तपणे सहभाग नोदवुन लसीकरण करुन घेतले.
उपकेंद्र लोदगा येथे मा.जि.प.सदस्य श्रीम कांबळे ताई यांच्या उपस्थितीत सदरील
लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गावातील सरपंच मा.गोमारे साहेब, उपसरपंच मा.भोईबार साहेब, गावातील प्रतिष्ठीत नागरीक तसेच मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेख आर. आर.साहेब व वैदयकीय अधिकारी डॉ.बिलापट्रे पी.जी आणि सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते व या केद्रावर एकुण आजपर्यंतचा उच्चांक आहे. 238. लाभार्थ्यांनी लस घेतली तो उपकेंद्र आलमला येथे मा. पं.स.सभापती श्रीम गायकवाड मॅडम यांच्या हस्ते आणि मा. सरपंच श्री निलंगेकर साहेब तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांच्या उपस्थितीत सदरील लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले व या केंद्रावर एकुण 176लाभाथ्यांनी लस घेतली. उपकेंद्र नागरसोगा येथे मोहिमेची उद्दघाटन मा. पं.स.सदस्य श्री चाबुकस्वार साहेब यांच्या हस्ते आणि मा. सरपंच व माजी पं. स. सभापती श्री सुर्यवंशी साहेब तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांच्या उपस्थितीत सदरील लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले व या केंद्रावर एकुण 77 लाभार्थ्यांनी लस घेतली.
उपकेंद्र मंगरुळ येथे सत्राचे उदघाटन मा.श्री सुभाष पवार जि.प.सदस्य, मा.श्री.परिक्षीत पवार आमदार पुत्र, मा.सुभाष जाधव भाजपा तालुका अध्यक्ष,मा.श्रीम बकुळाबाई दुधभाते पं.स.सदस्य तसेच मा.सरपंच व उपसरपंच आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांच्या उपस्थितीत सदरील लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले व या केंद्रावर एकुण 181 लाभार्थ्यांनी लस घेतली.
उपकेंद्र तावशी (ता) येथे सत्राचे उद्घाटन मा.श्रीम सुनिता व्यंकट घाडगे सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष श्री मुरलीधर रोडगे आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांच्या उपस्थितीत सदरील लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले व या केंद्रावर एकूण 70 लाभार्थ्यांनी लस घेतली.असा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय औसा जि.लातूर यांच्याकडून प्राप्त झाला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.