शहरात कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था सोबत बैठक

 




 लातूर/प्रतिनिधी: शहरात कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग कसा कमी करता येईल? या बाबत सामाजिक संस्था यांच्याशी विचार विनिमय करुन करावयाच्या उपाययोजना याबाबत झुम अ‍ॅप (Zoom App) व्दारे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील सामाजिक संस्थानी खालील दिलेल्या नंबर वर What’s App व्दारे संपर्क करुन ऑनलाईन बैठकीची लिंक घ्यावी. सदरील बैठक दिनांक.09/04/2021 (शुक्रवार) दुपारी 4:00 वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे. What’s App संपर्काकरीता श्री.रुक्मानंद वडगावे (मो.क्र.9011032210) या नंबर वर संपर्क करुन झुम अ‍ॅप (Zoom App ) ची लिंक घ्यावी.

       तरी शहरातील सामाजिक संस्थानी सदरील ऑनलाईन बैठकीत सहभाग नोंदवून आपला बहुमूल्य सल्ला/मार्गदर्शन करावे असे अहवान मा. आयुक्तलातूर शहर महानगरपालिका,लातूर यांनी केले आहे.


--




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या