*30 खेडी पाणीपुरवठा योजनाचा खंडीत विज पुरवठा जोडण्यात यावा व पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा*
*आमदार अभिमन्यू पवार यांची पालकमंत्री अमितजी देशमुख यांच्या कडे मागणी.*
औसा तालुक्यातील किल्लारी सह 30 गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेली माकणी प्रकल्पातून कार्यान्वित असलेली 30 खेडी पाणीपुरवठा योजना चे विजबिल थकित असल्याने सदर पाणीपुरवठा योजना चे विज कनेक्शन तोडण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग च्या अनुषंगाने राज्य शासनाने लॉकडाऊन केले असून नागरिकांना पाणीपुरवठा योजना बंद असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात व कोराना च्या संसर्ग अनुषंगाने लाॅक डाउन कालावधीत सदरच्या पाणीपुरवठा योजनेचे विज कनेक्शन तोडुन नागरिकांची गैरसोय होणे उचित नाही. पाणी असताना कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करण्यात आलेली आहे.
खरीप पिकांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व कोरानाच्या अनुषंगाने लाॅक डाऊन मुळे शेतकरी व शेतमजूर यांची अर्थिक स्थिती खालावली असुन पाणीपट्टी वसुली होऊ न शकल्याने सदर सह सर्व योजना चे देयके प्रलंबित आहेत.
कोरोना लॉकडाऊन कालावधीत नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी औसा तालुक्यातील किल्लारी सह 30 गावासाठी असलेली 30 खेडी पाणीपुरवठा योजनेचे विज कनेक्शन जोडण्याबाबत व पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत महावितरण व जिल्हा परिषद यांना निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री अमित विलासरावजी देशमुख यांच्या कडे आज भ्रमणध्वनी द्वारे केली. तसेच सदर पाणीपुरवठा योजना चे देयके 14 व्या वित्त आयोगातील निधी प्रमाणेच 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतीस परवानगी द्यावी अशी मागणी केली.
सदर पाणीपुरवठा योजनाचे विज जोडणी करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री महोदय यांनी आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना दिले तसेच 15 व्या वित्त आयोगाच्या निधी बाबत ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन पालकमंत्री महोदय यांनी दिले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.