*लातुर डॉ बाबासाहेब आंबेडकर* *पार्क येथे इंडियन हॅन्डिक्रॉप्ट नावाने* *चालू असलेला सेल अखेर बंद**
*भिम आर्मीच्या प्रयत्नाला यश*
*भिम आर्मीच्या निवेदनाची महानगरपालिकेने घेतली दखल*
लातुर प्रतिनिधी;-
लातूर जिल्हाधिकारी साहेबाने लातूर जिल्ह्यात वाढत आसलेल्या कोविड 19 रुग्नाची संख्या पाहता लातूर जिल्ह्यात आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच धार्मिक ,राजकीय ,अंदोलन, उपोषण ,यावर पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, कारण आठवडी बाजार,धार्मिक ,राजकीय कार्यक्रमात लोक एकत्र येऊन कोवाड 19 चे रुग्न वाढू शकतात म्हणून हा निर्णय जिल्हाधिकारी साहेबानी घेतला आम्ही ह्या निर्णयाचे स्वागत करतोत ,पण जिल्हाधिकारी साहेबानी काढलेला आदेश हा प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात पाठवले आहेत तरी लातूर शहर महानगरपालिके समोरील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी इंडीयन हाँन्डीक्राफ्ट या नावाने मोठा सेल उभा केलेला आहे ह्या सेल मध्ये हजारो लोक सेल पाहण्यासाठी येत आहे ,जर का आठवडी बाजार, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमातून कोविड वाढू शकतो तर ह्या सेलच्या माध्यमातून कोविड वाढणार नाही लातूर असा सवाल भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका चे आयुक्त याना निवेदनाद्वारे सवाल केला होता ,, महानगरपालिकेला हि गर्दी झालेली दिसत नाही का ? जिल्हाधिकारी साहेबाचे आदेश इथे लागू होत नाहीत का , ह्या सेलच्या माध्यमातून कोविड रुग्न वाढण्याची शक्यता आहे म्हणून हा सेल जिल्हाधिकारी साहेबाचे आदेश येणार नाही तोपर्यंत हा सेल बंद करावा ,म्हणून निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची दखल घेत अखेर चालू असलेला सेल बंद करा लागला या मुळे लातूरच्या सर्व आंबेडकरी जनतेतून भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.