नाभिक समाजाचा सरकार विरोधात आक्रोश
लातूर ः- लातूर जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांची ऑनलॉइन बैठक रविवारी रोजी 7ः00 वाजता पार पडली सदरील बैठकीमध्ये सर्वच समाजबांधवांनी सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करुन सरकारचा निषेध करण्यात आला. लॉकडाउन जाहीर करुन संपुर्ण महाराष्ट्रातील सलुन व्यवसायीकांचे व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळै मागील 8 दिवसामध्ये औरंगाबाद येथै गणेश सुभाष सैन्दाणे या 32 वर्षीय तरुणाने आर्थीक संकटाला घाबरुन आत्महत्या केली, काल दि.11/04/2021 रोजी उस्मानाबाद तालुक्यातील सांजा या गावातील मनोज झेंडे या सलुन दुकानदाराने चिठ्ठी लिहुन ठेउन आत्महत्या केली त्याने चिठ्ठी मध्ये लिहिले आहे की मागील लॉकडाउनचे भाडे थकलेले आहे मुलीचे लग्न जमलेले आहे त्यात पून्हा लॉकडाउन केल्यामुळै जगायचे कसे म्हणुन मी जिवन संपवतो असे म्हटले आहे. मागील लॉकडादन काळात महाराष्ट्रामध्ये नाभिक सलुन दुकानदार असलेल्या 24 बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत आमच्या संघटनेच्या माध्मातुन प्रदेश अध्यक्ष श्री कल्याण दळे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाला वारंवांर विनंती करुन निवदेने देउन राज्या शासनाने कसगीच दखल घेतली गेली नाही व कोणत्याच आत्महत्या गृस्त समाज बांधवांना कसलीच आर्थीक मदत केली नाही त्यामुळे संपुर्ण नाभिक समाज बांधवांच्या वतिने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाला उत्पनाचे इतर कुठलेच साधन नाही. त्यामुळे पूरता अडचणीत आला आहे. कोरोणाच्या भितीपोटी ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे गेली वर्षेभर नाभिक समाज हवालदिल झाला आहे. आमच्या समाजाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोर पालन केले आहे व शासनास नेहमी सहकार्य केले आहे. तथापी आमच्या सलुन व्यवसायातुन संसर्ग झाल्याचे ऐकीवात नाही. मग आमच्या समाजावर हा अन्याय का? असा प्रश्न समाज बांधव विचारत आहेत.
सरकारने नाभिक समाजावर उपासमारीचा वेळ आणली व्यवसाय सुरु केलेले आहेत. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचे हप्ते दुकानाचे आणी घराचे भाडे, लाईट बील, मुलांचे शिक्षण, घरचा किराणा व दवाखान्याचा खर्च कसा भागवायच हा यक्ष प्र्रश्न समाजाला पडलेला आहे. त्यामुळे समाज बांधव आत्महत्येसारख टोकाच पाउल उचलुन जिवन संपवत आहेत तरी या सरकारला पाझर फुटल नाही. म्हणुन या सरकारचा निषेध करतोत.
यावेळी जिल्हाध्यक्ष भाउसाहेब शेंद्रे, उपाध्यक्ष दिनकर दिघे असो अध्यक्ष जगन्नाथ गवळी, युवक अध्यक्ष अमोल सावंत, अशोक चमकुरे, विजय सुर्यवंशी, आण्णा सुरवसे, विजय श्रीमंगले, बालाजी सुर्यवंशी, नारायण महाबोले, अविनाश इबीतदार, अंकुश पवार, कृष्णा जगदाळे, कुमार पवार यांचे सह सर्व तालुक अध्यक्ष उपस्थीत होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.