शेतकरी संघटनेच्या मंजुताई निंबाळकर यांचा वंचित आघाडीत प्रवेश
लातूर / प्रतिनिधी : शेतकरी संघटनेच्या लातूरच्या जिल्हाध्यक्षा मंजुताई निंबाळकर यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शनिवार १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्षा मंजुताई निंबाळकर यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी लातूरचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, महासचिव डॉ. तात्याराव वाघमारे, निलंगा तालुकाध्यक्ष भरत गायकवाड, सुनिल सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील संघटन बांधणीबाबत चर्चा करण्यात येऊन लवकरच जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते व कार्यकर्ते आघाडीत प्रवेश करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष माळी यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.