शेडोळ बाल लैंगिक अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा
सम्राट मित्रमंडळाची मागणी
निलंगा:- (प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे शेडोल येथे अनूसूचीत जमातीतील बालीकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक न्यायालयात चालूवन आरोपीला कडक शासन करावे अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केली आहे.
आज मौजे शेडोळ ता. निलंगा येथे अत्याचार ग्रस्त कूटूंबाची युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,रिपाई चे जिल्हाध्यक्ष दिगंबरराव गायकवाड,सम्राट मित्रमंडळाचे अजय भालेराव,दिलीप भालेराव,सचिन बानाटे,सचिन कांबळे आदींच्या एका शिष्टमंडळाने पिडीतेच्या घरी जावून सांत्वनपर भेट दिली.या प्रसंगी पिडीत मुलीची आजी व अजोबाने घडलेली सर्व घटना कथन केली.तसेच मुलीच्या भावी जीवनाबद्दल चिंता व्यक्त केली.तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी अत्याचारग्रस्त कूटूंबीयांला तातडीने मदत करण्याबाबत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण लातूर यांना फोनवर विनंती केली.आठवडा भरात या कूटूंबीयांना मदत करण्याचे अश्वासन समाजकल्याण चे सहाय्यक आयुक्त लातूर त्यांनी या वेळेस दिले.
ही घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना असून हे प्रकरण शासनाने फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे,या प्रकारणाला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी,या पीडीत कूटूंबाचे तातडीने पुनर्वसन करावे,या पीडीत कूटूंबाला संरक्षण द्यावे अशी मागण्या युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी व रिपाई नेते दिगंबरराव गायकवाड यांनी केल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.