गोजमगुंडे परिवाराच्या वतीने दोन मनपास २ रुग्णवाहिका सुपूर्द महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा पुढाकार

 

गोजमगुंडे परिवाराच्या वतीने दोन मनपास २ रुग्णवाहिका सुपूर्द

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा पुढाकार







 लातूर  आफताब शेख प्रतिनिधी: कोरोना संकटाच्या काळात आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता लातूर शहर महानगरपालिका आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. मनपाच्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे व परिवाराच्या वतीने लातूरकरांच्या सेवेसाठी दोन रुग्णवाहिका महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आल्या.
  कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. संकटाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.परंतु असे असले तरी विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही त्यात आपला वाटा उचलण्याची गरज आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. याच भावनेतून गोजमगुंडे परिवाराने रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला आहे.
  बुधवार दि.२१एप्रिल रोजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी गोजमगुंडे परिवाराच्या वतीने मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे या रुग्णवाहिका सुपूर्द केल्या. एका साध्या कार्यक्रमात लातूरकरांसाठी या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
  यावेळी बोलताना महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की,सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि समोर दिसत असलेल्या भयावह परिस्थितीवर मात करण्यासाठी मनपा प्रशासन प्रामाणिकपणे लढत आहे. अनेकजण या लढ्यात आरोग्य सेवेसाठी आप-आपल्या परीने जेवढी शक्य आहे तेवढी मदत करत आहेत. मात्र मनपास रुग्ण वहिका मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या, भाडे तत्वावर देखील या रुग्णवाहिका उपलब्ध होणे शक्य होत नव्हते, आज एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर अत्यावश्यक यंत्रसामग्रीची आवश्यकता असताना गोजमगुंडे परिवाराच्या वतीने कोरोना काळाकरीता लातूरकरांच्या सेवेसाठी २ रुग्णवाहिका समर्पित करत आहोत. दोनच रुग्णवाहिका सर्वांसाठी उपयुक्त ठरण्यासाठी पुरेशा नाहीत. पण त्या अडचणीच्या वेळी नक्की उपयुक्त ठरतील आणि अनेकांना जीवदान देतील. या दोन्ही रुग्णवाहिका मनपाच्या माध्यमातून मोफत कार्यरत राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या