*हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त ,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
लातूर प्रतिनिधी
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारू ची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी दिलेले होते. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर ग्रामीण, प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मौजे- काडगावतांडा तालुका लातूर येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 5 इसमावर स्थानिक गुन्हे शाखा,लातूर यांच्या पथकाने रविवारी छापामारी केली यामध्ये 4600 लिटर रसायन किंमत 2 लाख 35 हजार रुपये चे रसायन आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे
या कार्यवाहीत
1) किशन बाबू चव्हाण राहणार काडगाव तांडा
2 ) अशोक पांडुरंग चव्हाण राहणार काडगावतांडा
3 ) विश्वनाथ नामदेव चव्हाण राहणार काडगावतांडा
4 ) सुखदेव हरीसिंग राठोड राहणार काडगावतांडा
5 ) राजाभाऊ चंदर राठोड
राहणार काडगाव तांडा तालुका जिल्हा लातूर.
अशा एकूण 5 आरोपीवर पो.ठाणे गातेगाव येथे गुरंन 51/2021,गुरंन 52/2021,गुरंन 53/3021, गुरंन 54/2021 , गुरंन 55/2021 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
वरील कामगिरीसाठी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड , राजेभाऊ म्हस्के राम गवारे ,हरून लोहार, युसुफ शेख,,सिद्धेश्वर जाधव ,सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे, प्रमोद तरडे, भिष्मानंद साखरे, नितीन कटारे, नागनाथ जांभळे, प्रदीप चोपने यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.