पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख याच्या घोषणे प्रमाणे
लातूर शहर महानगरपालिका बस वाहतूक सेवेचा विस्तार करण्यास
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिली परवानगी
Ø विदयार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरीकांना फायदा
Ø बाभळगाव, सोनवती – धनेगाव, गंगापूर, हरंगुळ, नांदगांव - साई,
कासारगाव या ६ मार्गावर धावणार बस
Ø मार्गावरील लगतच्या गावातील नागरीकांचीही सोय
: २६ एप्रिल :
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत चालविण्यात येणारी शहर बससेवा लातूर महानगरपालिका लगतच्या १५ किलोमीटर परिघातील ६ मार्गावरील बाभळगाव,
सोनवती – धनेगाव, गंगापूर, हरंगुळ, नांदगांव - साई, कासारगाव या गावांमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने शहर बस वाहतूक सेवेचा विस्तार करण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परवानगी दिली आहे.
लातूर शहरालगतच्या गावातील विदयार्थी, महिला, नागरीक आणि ज्येष्ठ नागरीकांची शहरात विविध कामासाठी सतत येजा आहे. या सर्वांच्या प्रवासाच्या सोयीसाठी लातूर महानगरपालिका शहर बस वाहतूक सेवेचा लगतच्या १५ किलोमीटर परिघातील गावांमध्ये विस्तार करणार असल्याचे लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जाहीर केले होते. या अनुषंगाने गंजगोलाई ते बाभळगाव, गंजगोलाई ते सोनवती – धनेगाव, गंजगोलाई ते गंगापूर, गंजगोलाई ते हरंगुळ, गंजगोलाई ते नांदगांव - साई, गंजगोलाई ते कासारगाव या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे नाहरकत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या मार्गावर शहर बससेवा सुरू करण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परवानगी दिली आहे. यामार्गावरील लगतच्या अन्य गावातील नागरीकांचीही प्रवासाची सोय होणार आहे.
लातूर महानगरपालिकामधील शहर वाहतुक बससेवेचा लाभ लगतच्या गावातील विद्यार्थी व नागरिकांना अधिकाधिक मिळावा, यासह महिला व विद्यार्थिनींना मोफत बससेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी प्रयत्न केले आहेत.
------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.