लोहारा :-शाहिद पटेल प्रतिनिधी
कोरोना संसर्ग वाढत असल्याने लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील ग्रामपंचायतीला दि.25 एप्रिल 2021 रोजी उस्मानाबाद जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांनी भेट देऊन कोरोना संदर्भात जनजागृती केली. नागरीकानी सोशल डिसटंट पाळावे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत, नागरीकांनी विनाकारण घराच्या बाहेर निघु नये, सॅनिटायझरचा वापर करावे, शासनाच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगितले. व तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, अशा विविध विकासकामाची पाहणी करुन कामा संदर्भात चर्चा केली. यावेळी उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी एम.व्ही. वडगावे, लोहारा प.स.चे गट विकास अधिकारी एस.ए. अकेले, ग्रामविकास अधिकारी एस.एम. बिराजदार, आष्टा कासारचे सरपंच सौ.सुलभा कांबळे, माजी सरपंच सुनील सुलतानपुरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन आष्टेकर, सतिश मोटे, खाजाभाई शेख, कर्मचारी नागनाथ बबले, जगन्नाथ कागे, पद्माकर मदने, खडूंसेन माने, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.