महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट 'अ' संघटने तर्फे अतिरिक्त जिल्हाधिकारी मा.अरविदजी लोखंडे यांनी केलेल्या असंविधानिक वक्तव्याच्या निषेध.
डॉ.आर.आर.शेख तालुका आरोग्य अधिकारी औसा तथा जिल्हा हिवताप अधिकारी लातूर यांचा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न.
औसा(प्रतिनिधी)जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रूग्णांची चौकशी करण्याकरिता धडक मोहिम आयोजित करण्यात आलेली होती.त्या अनुषंंगाने डॉ.आर.आर.शेख तालुका आरोग्य अधिकारी औसा तथा जिल्हा हिवताप अधिकारी लातूर हे ग्रामीण भागातील गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांना व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांना सकाळपासून किनीथोट,लामजना,सारोळा इत्यादी ठिकाणी भेटी देऊन सर्व सबंधितांना आवश्यक त्या सुचना दिल्या आणि भेटी देऊन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडे जात असताना श्री.अरविंदजी लोखंडे अतिरिक्त जिल्हाधिकारी लातुर यांनी तहसीलदार औसा श्रीमती शोभा पुजारी यांच्या मोबाईल वरून दूपारी ४:१० वाजता डॉ.आर.आर.शेख यांना फोन करून कुठे बोंबलत फिरतो रे,फालतु आहेस का रे अशा एकेरी,असभ्य व असंविधानिक भाषेत विचारणा केली.वास्तविक पाहता मागील एक वर्षापासून आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अविरत आरोग्य सेवा देत आहेत. हे काम करत असताना अक्षरशा कौटूंबिक अडचणींना बाजूला सारुन एकही दिवस रजा अथवा सुट्टी न घेता अविरत काम करत आहेत. अशा परिस्थतीत वरिष्ठ अधिकायांनी सर्व आरोग्य अधिका-यांचे मनोधैर्य उंचावणे सोडुन जर अशी असभ्य भाषा वापरली तर अधिका-यांचे मनोधैर्य खचुन जाऊ शकते व त्याचा विपरित परिणाम कामावर होऊ शकतो.
अशा परिस्थीतीत मा.श्री. अरविंदजी लोखंडे अतिरिक्त जिल्हाधिकारी,लातूर यांनी ज्या असभ्य व असंविधानिक भाषेचा वापर केला त्याचा मॅग्मो लातुर संघटने तर्फ जाहीर निषेध करण्यात येत आहे व भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही अनुषंगाने सबंधीतास मा.जिल्हाधिकारी यांनी योग्य ती प्रशासकिय कार्यवाही करावी हि विनंती.यापुढे असंविधानिक भाषेचा वापर झाल्यास सबंधितावर कायदेशीर करण्याचा इशारा मँग्मो
संघटना,लातुर देत आहे. यावेळेस डॉ.संतोष हिंडोळे,डॉ.सगिरा पठाण,डॉ.सचिन बालकूंदे,डॉ.नानेश्वर कदम,डॉ. राहूल आनेराव,डॉ.परमेश्वर हिरास,डॉ.एस.के.शिंदे,डॉ.आनंद कलमे,डॉ.शशिकांत डांगे, डॉ.पी.एस.कापसे,डॉ.उज्वला साळूंके,डॉ.सुधीर बनशेळकीकर,डॉ. सुभाष मदेवार,डॉ.सुधीर पेन्सलवार,डॉ.धनंजय सावंत उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.