आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून ईनामदार कुटुंबीयांचे सांत्वन...
औसा प्रतिनिधी/-शहराचे जुन्या काळातील नामवंत ज्येष्ठ व्यक्ती तथा खाजा नक्शबंदी रह. दर्ग्याचे सज्जादे हाजी सय्यद हाशमअली ईनामदार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या औसा शहर येथील निवासस्थानी जावून त्यांना श्रध्दांजली अर्पण करीत आमदार अभिमन्यू पवार यांनी ईनामदार कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी एमआयएम तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फरअली ईनामदार यांच्या यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेवक सुनील उटगे, युवा नेते संतोष मुक्ता, शहराध्यक्ष लहू कांबळे, प्रा भीमाशंकर राचट्टे, फईम शेख, सय्यद असलमअली ईनामदार, सय्यद मुज्जकिरअली ईनामदार व त्यांचा परिवार उपस्थित होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.