मनपाच्या वतीने ४५ वर्ष वरील नागरिकांना मोफत कोरोना लसीकरणास प्रारंभ जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी. - महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे आवाहन

 

मनपाच्या वतीने ४५ वर्ष वरील नागरिकांना मोफत कोरोना लसीकरणास प्रारंभ


जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी.
- महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे आवाहन 

लसीकरण केंद्रावर थेट जाऊनही घेता येईल लस







लातूर/प्रतिनिधी: शासनाच्या निर्देशानुसार लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने वय वर्ष ४५ पुढील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ औषधी भवन येथील केंद्रावर करण्यात आला. पहिल्या दिवशी शहरातील शेकडो नागरिकांनी लस घेतली. यावेळी रामदास भोसले, ईश्वर बाहेती, लातूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिशन चे पदाधिकारी तसेच मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील ४५ वर्ष व अधिक वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली असून ही नोंदणी करत या वयोगटात असणाऱ्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
  लसीकरणाच्या पुढील टप्प्याबाबत माहिती देताना महापौर गोजमगुंडे म्हणाले की, ४५ वर्ष पुढील सर्व नागरिक या दोन्ही वयोगटात समाविष्ट असणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये  आरोग्यसेतू ॲप अथवा CO-win ॲप डाऊनलोड करावे. cowin.gov.in या वेबसाईटवरही नोंदणी करता येऊ शकते. तेथे मिळणाऱ्या सूचनांनुसार नागरिकांनी आपली नोंदणी करून घ्यावी.
 संबंधित ॲपमध्ये नागरिकांनी नजीकचे लसीकरण केंद्र आणि तारखेची निवड करता येणार आहे. हे शक्य नसेल तर लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येऊ शकते.
 मनपाच्या लसीकरण केंद्र येथे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
लातूर मनपाच्या वतीने पटेल चौक येथील नागरी आरोग्य केंद्र, राजीव नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, लोकांते विलासरावजी देशमुख मार्ग येथील औषधी भवन, विलासरावजी देशमुख आयुर्विज्ञान केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर येथे मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच खाजगी रुग्णालयात  लसीकरणासाठी सशुल्क उपलब्ध राहणार असल्याचेही ते म्हणाले. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अतंर्गत असणाऱ्या खाजगी रुग्णालय येथे सशुल्क लस घेता येणार आहे.
सर्व लसीकरण केंद्रावर थेट जावून केवळ आधार कार्ड दाखवून लस घेता येणार आहे

महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या लसीकरण मोहिमेस सज्ज असून नागरिकांनी लसीकरणासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. लसीकरण करून घ्यावे आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहनही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

चौकट १
मनपाच्या लसीकरण केंद्र येथे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
लातूर मनपाच्या वतीने पटेल चौक येथील नागरी आरोग्य केंद्र, राजीव नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, लोकांते विलासरावजी देशमुख मार्ग येथील औषधी भवन, विलासरावजी देशमुख आयुर्विज्ञान केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर येथे मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या