*हातात तलवार घेऊन फेसबुक वर आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक*



 *हातात तलवार घेऊन फेसबुक वर आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक*

लातूर प्रतिनिधी





              याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सोशल मीडिया द्वारे एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट दिसून आली त्यामध्ये एक इसम हातामध्ये उघडी तलवार घेऊन फोटो काढून ते फेसबुक वर पोस्ट केले आहे. त्यावर पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये व अप्पर पोलीस अधीक्षक श्री.हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे व त्यांच्या टीमने नमूद इसमाचा शोध घेतला असता नमूद इसम हा गवळीनगर परिसरातील रोडवर मिळून आला.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव रवींद्रकुमार सुभाष अर्जुने,राहणार - गवळीनगर,लातूर असे असून त्याच्याकडून फेसबुक वर तलवारी सहित पोस्ट फोटो मधील तलवार त्याच्याकडून  जप्त करण्यात आली.

              रवींद्रकुमार अर्जुन याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार श्री यशपाल कांबळे यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे विवेकानंद येथे गुरन 223/2021 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा व 135 मुंबई पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. 

          या कामगिरी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार श्री.रवी गोंदकर श्री. खुर्रम काझी श्री.यशपाल कांबळे यांचा सहभाग होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या