बिरवलीतील "त्या" समाज कंटकावर ऑस्ट्रॉसिटी चा गुन्हा नोंद करून अटक करा
भादा पोलिसांकडे भिम आर्मीची मागणी
औसा-बुधवार दि 14 एप्रिल 2021रोजी बिरवली तालुका औसा येथे 130 व्या भिम जयंती निमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले बॅनर रीतसर ग्रामपंचायतची परवानगी घेउन उंच ठिकाणी लावण्यात आले होते त्या ठिकाणी अज्ञात समाजकंटकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची विटंबना करण्यात आली.
याची माहिती बिरवली येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी गोरे यांनी भादा पोलिसांना दि 16 एप्रिल 2021रोजी लेखी तक्रार दिली असता धार्मिक भावना दुखवल्याची गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यामुळे भीम आर्मी औसा तालुका संघटनेने त्या अज्ञात अज्ञात समाजकंटकांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावी अशी मागणी केली आहे.
याबाबत भीम आर्मीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरुवार दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी रात्री 11 ते दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उंचावर बसविलेल्या बॅनर वरील फोटोची अज्ञात मनुवादी इसमाने विटंबना केली असून त्या अज्ञात मनुवादी विरुद्ध अस्ट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई आणि शिक्षा देण्यात यावी अन्यथा भीम आर्मी औसा तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर भिम आर्मी औसा तालुकाध्यक्ष समाधान कांबळे,उपाध्यक्ष बिभिषण सरवदे,भादा येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय उबाळे,मलिक कांबळे,बिरवली येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी गोरे,विश्वजित गोरे,अभिषेक गोरे,मुकेश सुरवसे,कैलास वाघमारे,नागेश गोरे,अजिंक्य गोरे,अशोक गोरे आदी सह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.