सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब
यांच्या वाढदिवसानिमित्त
"कामाच्या ठिकाणी कर्मचारी, कामगार कोविड१९
लसीकरण मोहिमेचा" शुभारंभ
लस घेतली तरी नागरिकांनी संसर्गाचा समूळ उच्चाटना
पर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन
लातूर प्रतिनिधी : १८ एप्रिल :
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त रवीवर दि. १८ एप्रिल रोजी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळावर, राज्य आणि केंद्र शासनाच्या "कामाच्या ठिकाणी कर्मचारी, कामगार कोविड१९ लसीकरण मोहिमेचा" शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यानंतर कारखानास्थळी वृक्षारोपन करण्यात आले.
कोविड१९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचा वाढदिवस कोविड१९ मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत विधायक कार्यक्रमातून अगदी साधेपणाने साजरा केला गेला आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. अमित देशमुख म्हणाले की, केंद्र व राज्य शासन यांच्या सहकार्यातून कामाच्या "कामाच्या ठिकाणी कर्मचारी, कामगार कोविड१९ लसीकरण मोहिम" या कार्यक्रमाचा शुभारंभ लातूर जिल्ह्यात प्रथमच सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात येत आहे. लसीकरण मोहीमेत एसओपीचे पालन करावे, स्वतः यास घेतल्यानंतर इतरांनाही त्यासाठी तयार करावे, लॉकडॉऊनची अमलबजावणी व्हावी, गृहविलगीकरणाचे नियम कटाक्षाने पाळावेत, कोरोनामुक्त गाव अभियान राबवावे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि ५ व्हेंटिलेटरसह 30 ऑक्सिजनेटेड बेडची व्यवस्था उभारावी आदी सूचना या प्रसंगी बोलताना केल्या आहेत. तसेच राज्यशासनाकडून लातूर जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका तसेच ३० बेड मागे ५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ना. अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी दिली. पूढे बोलतांना ते म्हणाले, नागरिकांनी लस घेतली तरी आपणास कोरोना होणार नाही असा गैरसमज करून न घेता या संसर्गाचा समूळ उच्चाटना पर्यंत प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. या प्रादुर्भावाशी लढा देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून यात कोविड१९ नियमावलीचे पालन करीत जनतेची साथ देखील तितकीच महत्वाची असल्याचे सांगितले.
यावेळी माजी चेअरमन धनंजय देशमुख, संचालक तात्यासाहेब देशमुख, सुर्यकांत पाटील, नीलकंठ बचाटे, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पवार, सचिन शिंदे, नवनाथ काळे, बकंट कदम, शेरखॉ पठाण, सदाशिव कदम, अनिल दरकसे, बाबुराव जाधव, महेंद्रनाथ भालेकर, ज्ञानेश्वर भिसे आणि कार्यकारी संचालक जितेद्र रणवरे यांच्यासह विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
***********
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.