*कारेपूर परिसरात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे* *पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा*
*पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख*
: १२ एप्रिल :
लातूर जिल्हातील रेणापूर तालुक्यात कारेपूर परिसरात रविवारी दि. ११ एप्रिल रोजी दुपारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपदग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
रविवारी दुपारी कारेपूर आणि परिसरात अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, यात टोमॅटो, मिरची व व इतर भाजीपाला, आंबा तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. या संबंधीची माहिती कळताच राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आपादग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यादृष्टीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी स्वतः नेमक्या कोणत्या प्रकारचे नुकसान झाले, या आपत्तीची व्याप्ती किती आहे या संदर्भातीने देखील माहिती घेतली आहे.
-------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.