औसा येथे समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी संपन्न

 औसा येथे समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी संपन्न















औसा मुख्तार मणियार

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने 11 एप्रिल 2021 रविवार रोजी सकाळी १० वाजता औसा शहरातील माळी गल्ली  येथे क्रांतीसुर्य, स्त्री शिक्षणाचे जनक, दलित उद्धारक, व थोर शिक्षण तज्ञ महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त समता परिषदेचे तालुकाध्यक्ष सुधाकर माळी यांच्या स्वगृही- छतावरच लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून क्रांती सूर्याला आपली भावपूर्ण आदरांजली वाहून जयंती साजरी झाली.सर्वप्रथम केवळ ७  वर्षाच्या कुमारी चिमुकली महेश्वरी मदन सुरवसे हिने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपले चिमुकले हात जोडून आदरांजली वाहिली. यानंतर अ.भा.म.फुले समता परिषदेचे औसा तालुकाध्यक्ष सुधाकर माळी, सर्वश्री सा. का. किशन कोलते,डोक, चनबसप्पा केवळराम, गणेश तेलंग, गणेश केंद्रे, गणेश सूर्यवंशी, गोपाळ माळी, गणेश वतारी, युवा कार्यकर्त्यांसह, समता परिषदेच्या महिला अध्यक्षा सौ. उमाताई म्हेत्रे, सौ. मुक्ता सुरवसे, सौ. तेजस्विनी म्हेत्रे,कु. पल्लवी माळी,  या सर्वांची उपस्थिती होती.यावेळी एकेकानी आदरांजली अर्पण केली.औसा तालुकाध्यक्षांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती ते  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या