‘त्या’ चार रुग्णांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी
शहर जिल्हा भाजपाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
शहर जिल्हा भाजपाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
लातूर/प्रतिनिधी ः- शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये वीज खंडीत होऊन व्हेंटीलेटर बंद पडल्याने चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी ज्या उपाययोजना अवलंबल्या जात आहेत त्यातील त्रुटी दूर कराव्यात या आशयाचे निवेदन शहर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेले आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेने हाहाकार झालेला असून दिवसेंदिवस संसर्गाने बांधीताच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागलेली आहे. त्याचरोबर मृत्यांच्या संख्येतही भर पडू लागलेली असून शहरातील शासकीय रुग्णालमध्ये वीज खंडीत होऊन व्हेंटीलेटर बंद पडल्याची घटना घडली आहे. यामुळे चार रुग्णांचा मृत्यूही झाला असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात अशी मागणी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन शहर जिल्हा भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे. त्याचबरोबर शासकीय रुग्णांलयामध्ये व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेडची व्यवस्था उभारली आहे. मात्र वाढणार्या रुग्णसंख्येळे ती अपुरी पडत आहे त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे उपचाराअभावी प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णामध्ये ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावेत, रेमडेसिवर इंजेक्शिनची मागणी वाढली असून याचा पुरेसा साठा करत आवश्यक रुग्णांना त्याचा पुरवठा करण्यात यावा. आगामी काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून ऑक्सिजन व रेमडेसिवर इंजेक्शनची आगाऊ मागणी नोंदवून त्याची माहिती वेळोवेळी सार्वजनिक करण्यात यावी. या विविध मागण्याचे निवेदन शहर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्यांचे लवकरात लवकर पुर्तता करून सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या होणार्या नातेवाईकांची परवड थांबविण्यात यावी अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. सदर निवेदन शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, मनपा सभागृह नेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, शहर जिल्हा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, अॅड. दिग्विजय काथवटे यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना दिले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.