कोरोना पासून गावचे संरक्षण करण्यासाठी
ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी दक्ष रहावे
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
Ø प्रत्येक गावात लसीकरण मोहिम राबवावी
Ø गृहविलगीकरणातील रूग्णांना नियमीत औषध पुरवठा करावा
Ø आवश्यकतेनुसार गावात संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारावे
Ø गावागावात पोलीस पेट्रोलीग वाढवावी
Ø गावातील दुकानदार व विक्रेत्यांची कोरोना तपासणी करून घ्यावी
Ø बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांची कोरोना तपासणी करावी
Ø लोकप्रबोधनासाठी मोहिम राबवावी
Ø मास्क, सॅनीटयझर वापराची सक्ती करावी
लातूर प्रतिनिधी : २३ एप्रिल :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट अभुतपुर्व आहे, त्या पासून आपल्या गावचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी दक्ष रहावे गावात स्वंयशीस्त पाळावी, कोरोना विरोधी पथकाच्या माध्यमातून मार्गदर्शन सुचनांचे नियमन करावे, गृहविलगीकरण शास्त्रीय पध्दतीने राबवावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगव्दारे संवाद सांधतांना केले आहे.
कोवीड१९ प्रादूर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातुन आज शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहर विधानसभा मतदार संघातील २७ गावचे सरपंच व सदस्य, जि.प., प.स.सदस्य, तहसिलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, तसेच ग्रामसेवक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगव्दारे संवाद साधला. यावेळी प्रारंभी त्यांनी प्रत्येक गावच्या सरपंचाकडून गावातील सदयाची कोरोना प्रादूर्भावाची परिस्थिती, एकुण रूग्ण, या रूग्णालवर होत असलेले उपचार, प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपयायोजना, या उपाययोजना अंमलबजावणी करतांना येत असलेल्या अडचणी या संदर्भाने माहिती जाणून घेतली.
सर्व गावातील परिस्थितीची माहिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक गावात लसीकरण मोहिम राबवावी, गृहविलगीकरणातील रूग्णांना नियमीत औषध पुरवठा करावा, आवश्यकतेनुसार गावात संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारावे, गावागावात पोलीस पेट्रोलीग वाढवावी, गावातील दुकानदार व विक्रेत्यांची कोरोना तपासणी करून घ्यावी, बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांची कोरोना तपासणी करावी, लोकप्रबोधनासाठी मोहिम राबवावी, मास्क, सॅनीटयझर वापराची सक्ती करावी आदी प्रकारच्या सुचनाही गावचे प्रमुख व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या बैठकी दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.
या व्हिडीओ कॉन्फ्रिन्सिग बैठकीत लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, संचालक दगडूसाहेब पडीले, पंचायत समीती सभापती सरस्वती प्रताप पाटील, उपसभापती मुन्ना ऊफाडे, जिल्हा परिषद सदस्य पंडीत ढमाले, परमेश्वर वाघमारे, साधना सुभाष जाधव, सोनाली थोरमाटे, तहसिलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी शाम गोडभरले, आरोग्य अधिकारी अशोक सारडा यांच्यासह सर्वश्री नांदगाव ग्रामपंचायतचे सरपंच महादेव ढमाले, महापूर सरपंच शिवाजी बनसोडे, बोरवटी सरपंच गणेश नाथजोगी, कासारगाव सरपंच अशोक सूर्यवंशी, उपसरपंच जयदेव मोहिते, हणमंतवाडी सरपंच अच्युत माने, आर्वी सरपंच बापू चव्हाण, पप्पू देशमुख, साई सरपंच सुमित्रा माने, वरवंटी सरपंच दिलीप चिकटे, बाभळगाव सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, बसवंतपूर सरपंच दुष्यत वाघमारे, हरंगुळ खुर्द सरपंच दादा पवार, धनराज पाटील, हरंगुळ बु. सरपंच सूर्यकांत सूडे, बारा नंबर पाटी सरपंच सुरेखा नरेंद्र बनसोडे, खाडगाव सरपंच रमाकांत मगर, महाराणा प्रतापनगर सरपंच संगीता मदन पतंगे, कातपुर सरपंच रेणुका ऐतनबोने, सिकंदरपुर सरपंच रेश्मा गंभीरे, सिरसी सरपंच कौशल्या कांबळे, वासनगाव सरपंच सुखदेव पाटील, पाखरसांगवी सरपंच संतोष इरलेवाड, खंडापूर सरपंच कुमार पाटील, खोपेगाव सरपंच तेजाबाई मोरे, चांडेश्वर सरपंच शिवाजी गायकवाड, पेठ सरपंच कुमार लाळे, गंगापूर सरपंच बाबू खंदाडे, कव्हा सरपंच पद्मिनी सोदले, महापूरतांडाचे विजय चव्हाण सहभागी झाले होते.
-------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.