*श्याम नगर येथील ग्रामस्थ आणि मुक्या जनावरांचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची ?*
लातुर : दि. २३ - लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसीमध्ये श्याम नगर ग्रामपंचायत म्हणजेच बारा नंबर पाटी या गावाच्या वस्ती लगत कीर्ती मिल चा उद्योग उभा केलेला आहे. अत्यंत चुकीच्या जागेवर हा कारखाना उभा केलेला असून ज्याचे दुष्परिणाम येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर सध्याही होत आहेत आणि भविष्यातही गंभीर स्वरूपाचे होणार असल्याचा इशारा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी दिला आहे.
या कीर्ती मिंलच्या व्यवस्थापनाने एवढा भयंकर कहर केला आहे, कीर्ती मिल मधले दूषित, घाण, आणी केमिकलयुक्त विषारी पाणी हे चक्क कारखान्याच्या बाहेर काढून पाईप टाकून आणि जेसीपी लावून मोठा नाला करून हे सर्व खराब दुर्गंधीयुक्त आणि विषारी पाणी सार्वजनिक तलावात नेऊन सोडले आहे. याच तलावामध्ये श्याम नगर ग्रामपंचायतीची गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर असून याच विहिरीतले पाणी शाम नगर येथील ग्रामस्थांना दररोज नळ योजनेद्वारे पुरवठा केले जाते आणि तेच पाणी श्याम नगर चे ग्रामस्थ पीत असतात. याच तलावावर गावातील शेतकऱ्यांची जनावरे पाणी पिण्यासाठी येत असतात. या दुर्गंधीयुक्त आणि विषारी पाण्यामुळे जनावरांच्या आणि माणसांच्या ही जिवाला मोठा गंभीर धोका निर्माण झालेला असून यातून अनेकांचा मृत्यू वोढावण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात या घाण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आणि विषारी केमिकल मिश्रित पाण्यामुळे मृत्यू ओढवल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल प्रशासनासमोर लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी विचारला आहे. गावालगत कीर्ती मिलला चुकीचा भूखंड वाटप करणारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी हे जबाबदारी घेतील काय ? कीर्ती मिलच्या कारखान्यातून हे दुर्गंधीयुक्त केमिकल पाणी तलावात सोडलेले एमआयडीसीच्या अधिकाऱ्याला अजून माहित झाले नाही काय ? असाही प्रश्न एमआयडीसीच्या अधिकाऱ्याला व्यंकटराव पनाळे यांनी विचारला आहे. का माहीत असूनही एमआयडीसीचे अधिकारी कीर्ती मिल कडून नियमित मिळणारा हप्ता यामुळे गप्प आहेत का ? याचा खुलासा लातूर एमआयडीसी मध्ये अनेक वर्षापासून सेवेत असलेले आणि भूखंड वाटपात मशहूर असे हे नरवाडे करतील का ? असे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे. एमआयडीसीचे अधिकारी या विषारी केमिकलयुक्त पाण्यामुळे शामनगर वरील रहिवाशांचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी स्वीकारणार आहेत काय ? असेही पनाळे यांनी म्हटले आहे. प्रदूषण मंडळाच्या प्रामाणिक हप्तेखोरीबद्दल तर न बोललेले बरे ! कारण प्रदूषण मंडळाचे अधिकारी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचेही लक्षात येत असल्याचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे. एकुणच अशी विचित्र परिस्थिती आहे आणी ही सगळी परिस्थिती पाहता श्याम नगर वरील रहिवाशांचा आणि तेथील मुक्या प्राण्यांचा जीव धोक्यात आहे एवढेच म्हणता येईल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.