आ संभाजी पाटील निलंगेकरांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

 

आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस






निलंगा/प्रतिनिधी ः- केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरनाची मोहीम राबविण्यात सुरुवात झाली आहे.  या अंतर्गतच आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यावेळी आ. निलंंगेकरांनी ही लस पुर्णपणे सुरक्षीत असून नागरीकांनी सरकारच्या निर्देशानुसार लसीकरण मोहीमेत  सहभागी होऊन कोरोना विरोधाच्या लढाईला अधिक बळ द्यावे असे आवाहन केले.
संपूर्ण जगाला हादरून टाकणार्‍या कोरोना संसर्गाने भारतातही हातपाय पसरलेले आहेत. या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असणार्‍या लसीचे जगभरात संशोधन सुरु झालेले होते. यामध्ये भारताने सर्वात प्रथम लस विकसीत करून ती देशातील नागरीकांना उपलब्ध करून दिली आहे. भारताने उत्पादित केलेली लस ही सर्वाधिक सुरक्षीत असल्याचे जगभरातील संशोधकांनी मान्य केलेले आहे. त्यामुळेच या लसीला जगभरातून मोठी मागणी आहे. मात्र ही लस सर्वप्रथम देशातील नागरीकांना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने लसीकरण मोहीम सुरु केलेली आहे. दि. 1 एप्रिल पासून या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु झालेला असून या अंतर्गत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज निलंगा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.
निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, डॉ. दिलीप सौंदाळे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. लालासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत आ. निलंगेकरांनी ही लस घेतलेली आहे. कोरोनाला प्रतिबंध करणारी ही लस अतंत्य सुरक्षीत असल्याचे सांगून नागरीकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी ही लस घ्यावी असे आवाहन केले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक समाज घटकांनी ही लस घेऊन कोरोना विरोधाच्या लढाईला अधिक बळ द्यावे असे आवाहनही यावेळी आ. निलंगेकरांनी केले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या