*स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभार* *चढ्या भावाने* *विक्री*
लातुर प्रतिनिधी :
- शुक्रवार दि.9 एप्रिल
राज्यात मागील एक वर्षांपासून कोरोनसदृश्य परिस्थिती असल्याकारणाने सर्वसामान्य नागरिकांना लॉक डाऊन सारख्या परिस्थिला सामोरे जावे लागते आहे, सततच्या लॉक डाऊन मुळे लहान सान उद्योग धंद्यांना मोठे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते आहे.शिवाय ग्रामीण परिसरात कांहीना दररोज रोजनदारी केल्याशिवाय पर्याय नाही, परंतु ज्या उद्योग धंद्यावर ज्यांचा व्यवसाय सुरू होता तेही बंद आहेत.अशा सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाह भागवण्यासाठी शासनाच्या वतीने गरिबांना मोफत धान्य योजना राबविण्यात आली.परंतु कालांतराने ती योजना कांही दिवसासाठीच होती.परंतु सर्वसामान्य जनतेला स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक व्यक्तीला पाच किलो याप्रमाणे गहू दोन रुपये ,तर तांदूळ तीन रुपये दराने लाभार्त्याना वितरण करण्याचा शासनाचा आदेश असतानाही
निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार मोहनराव विश्वभर लामतुरे यांचा मनमानी कारभार चालू असतानाच चित्र पहावयास मिळते आहे.प्रत्येक किलोमागे एक या दोन रुपये जास्त दराने प्रत्येक लाभार्थी कडून घेतातही आणि एखाद्या लाभार्थीने पैसे जास्त का घेता असे विचारले असता ,तुम्ही कुठे जायचे तेथे जा पावती मिळत नाही, माझ्याकडे तक्रार वही सुद्धा नाही, धान्य गावात आणून देतो तेच उपकार समजा असे लाभार्थीना हिंनवून बोलतो, मात्र गोरगरीब जनता नाविलाजास्तव त्यांचे बोलणे मागील कित्येक वर्षांपासून सहन करत आहेत.यामुळे त्यांच्या या अशा मनमानी कारभारास एखाद्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दमदाटी करतो.यामुळे चुपचाप सर्वसामान्य जनतेला दर महिन्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे.ग्रामीण परिसरात अनेक अल्पभूधारक, अल्पसंख्यात्मक समाज असल्याने त्यांना न्याय मिळेल का?
प्रशासनाच्या नियमावलीनुसार सर्वसामान्यांना स्वस्त धान्य मिळावे अशी मागणी कोकळगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.आता तहसीलदार ग्रामीण भागातील जनतेना न्याय देणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.