शासकीय रुग्णालयातील कोविंड रुग्णांना त्यांच्या आप्तस्वकीयांना भेटण्याची आणि पाहण्याची परवानगी देण्यात यावी.
लातुर : दि.९ - सध्या महाराष्ट्रामध्ये कोविडने थैमान घातले आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये पेशंट दाखल झाल्यास त्याला भरमसाठ बिल येते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला नाविलाजाने सरकारी दवाखान्यात कोविड उपचारासाठी दाखल केले जात आहे. मात्र सरकारी दवाखान्यात पेशंट दाखल केल्यानंतर पेशंटचे नातेवाईकांना भेट देण्यासाठी बंदी आहे. आपल्याला कोणीही भेटायला येत नाही अशी भावना होऊन तो रुग्ण हा मानसिक रुग्ण होत आहे. त्याच्या मनावर दडपण येत आहे. त्यामुळे तो सरकारी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर आता माझं संपलं, माझे नातेवाईक मला भेटू शकत नाहीत. मी आता या दवाखान्यात शेवटचे दिवस घालवत आहे. असे त्या पेशंटला भिती वाटत आहे. यामुळे त्याचे मनोधैर्य खचून जात आहे. तेंव्हा प्रशासनाने ज्या कोणत्या पेशंटचे नातेवाईक जर सदरील रुग्णास भेटण्यासाठी तयार आहेत, तर अशा नातेवाईकांना योग्य ते अंतर ठेवून त्या पेशंटला भेटण्याची व्यवस्था झाली तर, जे औषध तुम्ही रुग्णाला बरे होण्यासाठी देणार आहात, त्यापेक्षा जास्त ताकत देणारे औषध म्हणजे त्या रुग्णाने त्याच्या नातेवाईकांना भेटल्यानंतर रुग्णाची जी सकारात्मक मनस्थिती तयार होते त्यामुळे रुग्णालयाने दिलेले औषध रुग्णावर चांगले काम करू शकते. आणि जे रुग्ण असे भयभीत आहेत त्या रुग्णांची मानसिक शक्ती त्यांच्या नातेवाईकांना पाहिल्यामुळे वाढेल. आणि या कोरोनावर तो रुग्ण मात करेल. रुग्णाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाल्यास मृत्युदर सुद्धा कमी होऊ शकतो. तेंव्हा प्रशासनाने रुग्ण आणि नातेवाईक यांना योग्य ती काळजी घेऊन भेटण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसे आदेश सर्व रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाने काढावेत अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.