*राज्यातील जनतेने तुम्हाला सत्ता दिली, काही देऊ नका, फक्त त्यांचा जीव वाचवा.*
(रिपाई डी च्या भाई विजय चव्हाण यांची आर्त भावना)
*मुंबई दि (प्रतिनिधी) राज्यातील जनतेने तुम्हाला मतदान करून निवडून आणले, तुम्ही सर्वजण सत्तेत बसलात काही देऊ नका मात्र मतदारांचे जीव तर वाचवा अशी आर्त भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय युवा सचिव आणि बंजारा नेते विजय चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यां पुढे प्रकट केली.*
राज्यातील गरीब माय बाप जनतेने मतदान करून तुम्हाला लोकशाही मार्गाने निवडून आनले आहे, आज त्यांचे हातावर पोट आहे, 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू देऊन तुम्ही कांय सिद्ध करीत आहात? लोकशाही मध्ये मतदार हा राजा असतो आणि मतदार राजाची अवस्था तुम्ही भिकार्या सारखी केली आहे.
वर्ष झाले भिकेला लागलेली अवस्था आणि अन्नविना पाठीला लागलेले पोट आणि कोरोना मुळे तर लोक मरतातच परंतु आज भुकेमुळेही लोक मरत आहेत, ज्यांच्या मतदानावर आज तुम्ही सत्तेत आहात राजसिंहसनावर आहात त्यांना काही देऊ नका तुमचे गहू नको, तांदूळ नको, काहीही नको, फक्त त्यांचा जीव वाचवावा ही आर्त भावना भाई विजय चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे.
सरकारने खाजगी हॉस्पिटल्स व मंदिरातील जमापुंजी ताब्यात घेऊन या महामारीला गाडाव आणि राज्याची आर्थिक बाजू मजबूत करून जनतेला ताराव. असा मार्मिक पण महत्वाचा सल्ला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व सोसिअल मीडिया राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.