अहिल्यादेवी होळकर यांचा जाणीवपूर्वक अवमान करणा-या अतुल परचुरेच्या थोबाडाला काळं फासू : भीम आर्मीचा इशारा
करमाळा प्रतिनिधी: लक्ष्मण कांबळे
बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या पुण्यश्लोक, राजमाता आहिल्याराणी होळकर यांचा जाणीवपूर्वक अवमान करणारा अतुल परचुरे नीच मानसिकतेचा असुन या संतापजनक जनक वक्तव्यावर त्याने समस्त बहुजन समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा परचुरेला घरात घुसून थोबाडाला काळं फासू अशी संतप्त प्रतिक्रिया भीम आर्मीच्या राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी दिली आहे. कलर्स मराठी चॅनलवर सुपरफास्ट काॅमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमात इतरांना हिणावून बोलताना मनुवादी अतुल परचुरे नामक व्यक्तीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा अहिल्याबाई होळकरीन असा जाणीवपूर्वक ऐकेरी भाषेत उल्लेख करून महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील संपुर्ण बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
परचुरे सारख्या अनेक संघी पिलावळी प्रसिद्धीसाठी
वेळोवेळी बहुजन महापुरूष ,महामातांचा अवमान करण्यात अग्रेसर असतात. त्यातून या लोकांची नीच मानसिकता दिसून येते. यापुढे टिव्हि चॅनल वाल्यांना इशारा देत की महापुरूषांच्या अवमान करणारे असले कार्यक्रम आपल्या चॅनलवर आयोजित करू नये. नाहीतर त्यांना भीम आर्मीच्या दणक्याने जसास तसे उत्तर देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया भिम आर्मीच्या वतीने राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी दिली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.