लॉकडाऊन च्या काळात किराणा मालाची चढ्या दराने विक्री

 लॉकडाऊन च्या काळात किराणा मालाची चढ्या दराने विक्री




औसा प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार देखील किराणा भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे सांगून किराणा दुकानदार चढ्या दराने किराणा मालाची विक्री करू लागले आहेत. त्यामुळे आता चढ्या दराने विक्री करणाऱ्या करणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व सामान्य माणसाकडून जोर धरू लागली आहे.

जीवनावश्यक वस्तूची खरेदी करताना एकाच ठिकाणी गर्दी करू नका, आपल्या भागामध्ये असणाऱ्या या दुकानदाराकडून वस्तूची खरेदी करावी असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजना चा तो एक भाग असून योग्य देखील आहे. मात्र या संधीचा फायदा घेत आता काही दुकानदार चढ्या दराने किराणा मालाची विक्री करतांना दिसून येत आहेत. त्यामुळे किराणा मालाचे दर वाढू लागले आहेत. घाऊक व्यापाऱ्यांकडुन दर वाढवले जात असल्यामुळे आम्हाला देखील दर वाढवावा लागत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे मत आहे. वास्तविक संचार बंदी मुळे कोणत्याही किराणा मालाचा भाव वाढलेला नाही. लॉकडाऊनमुळे आता जीवनावश्यक वस्तूची खरेदी करताना आर्थिक फटका बसू लागला असून जादा दराने जीवनावश्यक वस्तू विकणा-यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्याच्या पुरवठा विभागाला कधी जाग येईल अशा लुटारू दुकानदारावर काय कारवाई करेल याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या