मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध मागणीचे मुख्यमंत्री यांना निवेदन

 मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध मागणीचे मुख्यमंत्री यांना निवेदन






औसा प्रतिनिधी

मुंबई: प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आणि पत्रकारीतेतर कर्मचारी यांच्यासाठी माध्यम आस्थापना प्रत्येकी 25 ओळखपत्र देण्याची मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी केली होती. या मागणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून त्याबाबतचे आदेश सोमवार दिनांक 26  एप्रिल 2021 रोजी शासकीय स्तरावर काढण्यात येणार आहेत. या मागणीबाबत मुख्यमंत्री अनुकूल असल्याची माहिती, राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालयाचे संचालक (वृत्त) श्री गणेश रामदासी यांनी आज दिली. माध्यमाच्या प्रतिनिधींनी कडक लाॅकडाऊनच्या काळात प्रतिबंध करण्यात आला आहे. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही लोकल प्रवास प्रतिबंध केला आहे. पत्रकारांमध्ये याबाबत तीव्र भावना असून पत्रकार आंदोलनाच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर  दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7  वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात विविध पत्रकार संघटनेची बैठक  दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 4  वाजता मुंबई मराठी पत्रकार संघातून ऑनलाइन होणार आहे. या बैठकीत पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत तसेच भूमिका घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या अनुषंगाने आज यासंदर्भात पत्रकार संघात उद्याच्या बैठकीबाबत प्राथमिक चर्चा झाली. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह विष्णू सोनवणे, एनयूजे (महाराष्ट्र) अध्यक्ष शितल करदेकर, जयवंत बामणे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या