औसा येथे महावीर जयंती साजरी

 औसा येथे महावीर जयंती साजरी





औसा प्रतिनिधी:- जगाला शांतीचा व अहिंसेचा महान संदेश देणारे जैन धर्माचे चौविसावे तीर्थांकर भगवान महावीर यांची जयंती येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात साध्या पद्धतीने व कोविडच्या नियमाचे पालन करून साजरी करण्यात आली.



 यावेळी भगवान महावीर यांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात येऊन जन्मसोहळा साजरा करण्यात आला. भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश दुरुगकर यांच्या हस्ते मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नेमिनाथ विभुते, सुरेश दुरुगकर  राजेंद्र दुरुगकर, कमलाकर दुरुगकर, धनेद्र दुरुगकर, हेमताई विभुते यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या