वै.ह.भ.प सेवाभुषन भानुदास काका कुमठेकर वारकरी सेवा प्रतीष्ठान सामाजिक कार्य करणारी वारकरी प्रतीष्ठाण

 वै.ह.भ.प सेवाभुषन भानुदास काका कुमठेकर वारकरी सेवा प्रतीष्ठान  सामाजिक कार्य करणारी वारकरी प्रतीष्ठान 




वै.ह.भ.प सेवाभुषन भानुदास काका कुमठेकर यांच्या नावाने चालु असलेले वारकरी सेवा प्रतीष्ठान हे अनेक सामाजिक कार्य करत असते वारकर्यांचा सन्मान व सत्कार केला जातो व वृक्षारोपण लहान मुलांना व मुलींना शालेय साहित्य वाटप करणे मनोरुग्णांची सेवा करणे असे अनेक कार्य करत आहेत या संघटनेत युवा वर्ग व वयस्कर व्यक्ती आहेत हे  संघटन महाराष्ट्र व कर्नाटक या ठीकाणी कार्य करते व या संघात कार्य करणारे सर्व निस्वार्त भावनेने कार्य करत असतात वै.ह.भ.प सेवाभुषन भानुदास काका कुमठेकर यांनी आपले पुर्ण आयुष्य परमार्थ करण्यात घालवले ते सदा म्हणायचे रिकामा अर्धा घडी राहू नको लटिका का व्यवहार सर्व हा संसार .

त्यांनी पूर्ण आपला आयुष्य गुरुसेवा मधेच घालवले त्यांनी पंढरीची महिन्याला वारी केली व आषाढी-कार्तिकी पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर अशी जाता-येता आषाढी कार्तिकी अशी वारी आयुष्यभर केली त्यांनी परमार्थ ज्या गावात नाही त्या गावात परमार्थ सुरू केला या गावात सप्ताह सुरू नाही त्या गावात सप्ताह सुरू केला भजन सुरू केलं किर्तन सुरू केलं सर्वांना परमार्थिक मार्ग दाखवला गुरु विषयाची आवड निर्माण केली सर्वांना वारकरी नियम सांगितले हरिपाठ करणे तुळशीला पाणी घालणे आई-वडिलांची सेवा करणे पंढरीची वारी करणे असे अनेक नियम सर्वांना सांगितले व गावोगाव परमार्थ सुरू केला आपलं पूर्ण परमार्थ करत असताना कीर्तन करत असताना निस्वार्थ भावनेने कीर्तन केले आलेला पैसा एकही रुपया संसाराला लावला नाही आलेले सर्व पैसे वारकऱ्यांच्या सेवेत व वारीत द्यायची व कधी  कधी संसारिक जीवनावर आशा ठेवली नाही परमार्थ हा पैशासाठी करायचा नसतो परमार्थ आपल्या जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी आहे असे अनेक गोष्टी सर्वांना समजावून सांगितल्या त्यांच्या जीवनामध्ये सेवाही खूप होते हे सर्वांना माहित होतं सर्वांच्या मनामध्ये परमार्थ सांगितल्यामुळे बसवल्यामुळे सर्वांच्या मनामध्ये  काका हेच त्यांना गुरु वाटायची पण काकांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वांनाच धोंडोपंत दादा साहेब हेच आपले गुरु ही शिकवण सर्वांना दिली त्यांनी आयुष्यभर केलेला परमार्थ आहे त्यांच्याविषयी आपण जेवढे बोलू तेवढे कमीच आहे त्यांनी मी संसार कमी परमार्थ जास्त केला व त्यांच्याविषयी बोलणं आमच्यासाठी खूप खूप खूप आमच्या वाणी अपुरी आहे ती खूप महान होते आमच्यासाठी ते गुरुच आहेत आमच्यासाठी ते प्राण आहेत पण त्यांनी सर्व वारकर्यांना पोरक करून सर्वांच्या डोक्यावरची छाया निघून गेली असे सर्वांना झाले त्यांची अंत्यविधी चालू असताना सर्वांनी पाहिलं जे तुकोबांच्ये प्रमाण होते शूर कळे रणी साधू कळे मरणे याप्रमाणे काकांच्या अंत्यविधीला लाखोचा समाज होता आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस हस्ती गोळा करण्यात आली त्यावेळी कंठा ची असते होती त्या हस्ते वर राम कृष्ण हरी स्पष्टपणे लिहिलेले होते हे श्री हरिभक्त परायण निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी आपल्या हातामध्ये घेऊन पाहिलं काकांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडले पण काकांनी कधीच ते चमत्कारात दाखवून दिले नाही असं निस्वार्थ प्रेम परमार्थ करणाऱ्या वारकऱ्यांच्या नावावर चालणार आहे प्रतिष्ठान या प्रतिष्ठानमध्ये अनेक युवकांचा समावेश आहे कर्नाटक राज्यात संपर्कप्रमुख म्हणून विष्णू बिरादार सुद्धा कार्य करतात या संघाविषयी बोला भानुदास काका साहेब कुमठेकर यांच्यानंतर यांचा परंपरा टिकवण्याकरता त्यांचे नातू श्री हरिभक्त परायण आत्माराम महाराज कुमठेकर यांनी काकांच्या सोबत असताना सुद्धा पायी वारी केली आता सुद्धा ते पायी वारी करतात कीर्तन करतात भजन कर भजन करतात आणि निस्वार्थ भावनेने परमार्थ करत असतात काकांच्या पाठीमागे आपणही पैसा संसाराला न लावता त्यांनी सामाजिक कार्याला लावण्याचा निर्णय घेतला होता व कल्याण वारकऱ्यांसाठी वापरत असायचे पण लॉक डाऊन चालू असल्यामुळे वारी बंद झाली आहे वारकऱ्यांची सेवा करण्याचा माझ्याहातून व सेवा घडली नाही याची मला खूप दुःख वाटतं असे आत्माराम महाराजांनी सांगितले व त्यांनी कोरोना महामारीच्या  काळात गुरजु लोकांना मास्क वाटप अनेक कार्य करतात

आत्माराम महाराज कुमठेकर हे अनेक सामाजिक कार्य करत आहेत जसे लहान मुलांना व मुलींना शालेय साहित्य वाटप करणे वृक्षारोपण करणे व मनोरुग्नांची सेवा करणे असे अनेक कार्य आत्माराम महाराज कुमठेकर यांनी केले आहे व त्या मुळे त्यांना अनेक पुरस्कार व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे समाजसेवक. कोरोणा योद्धा . उत्कृष्ट पत्रकार. समाजरत्न असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत ते बोल महाराष्ट्र न्यूज कार्यकारी संपादक म्हणुन काम करतात तर लातूर रत्न उपसंपादक म्हणून काम करत निर्भिड विचार लातुर प्रतीनिधी तर असे अनेक न्युज चॅनल व पेपर मध्ये त्यांनी कार्य केले आहे व ते कार्य करत असताना त्यांना गावातील व बाहेर गावचे युवा वर्ग खुप मदत करतात  मास्क वाटप करताना नामदेव घुगे. राम घुगे . मनोज फड यांनी त्यांची मदत केली 

असे अनेक सामाजिक कार्य पाहून प् आलीआत्माराम महाराज कुमठेकर  यांनी 1000 मास्क वाटप केले व लवकरच सेनिटायजर वाटप व फवारणी करणार आहे अशी माहिती दिली आहे 

व असेच सामाजिक कार्य माझ्या हातुन आयुष्यभर घडावे अशी भगवंताकडे मागनी केली 

व सर्व जनतेला विनंती केली की सर्वांनी या कोरोना महामारीच्या काळात विना कारण फीरु नका मास्कचा वापर करा सेनिटायजरने  हात स्वच्छ धुवावेत आणि पुर्ण महाराष्ट्रात जसे ऑक्सिजन' कमी पडत आहे म्हणुन अनेक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत सर्वानी कमीत कमी दोन झाडे लावावेत अशी सर्वांना विनंती केली झाडे लावा झाडे जगवा पर्याय वरणाचे रक्षण करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या