आय एम ए कार्यकारिणीने स्वीकारला पदभार . अध्यक्षपदी डॉ. सुरेखा काळे तर सचिवपदी डॉ. हनुमंत किणीकर यांची निवड.





आय एम ए  कार्यकारिणीने स्वीकारला पदभार .
 अध्यक्षपदी डॉ. सुरेखा काळे तर सचिवपदी डॉ. हनुमंत किणीकर यांची निवड.
इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेच्या 2021- 22 या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला आहे. नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ.सुरेखा काळे यांची तर सचिव म्हणून डॉ. हनुमंत किणीकर यांची निवड झाली आहे.
याशिवाय पुढील वर्षाच्या अध्यक्षपदी  2022-23 साठी डॉ.कल्याण बरमदे उपाध्यक्ष म्हणून डॉ.अनिल राठी,डॉ राजेश एनाडले, डॉ.अशोक पोद्दार, डॉ.अभय कदम यांची नेमणूक झाली आहे. खजिनदार म्हणून डॉ.रामेश्वरि आलाहाबादे , तर सचिवपदी डॉ.आझाद शेख डॉ.विमल डोळे डॉ.ज्योती सूळ राहणार आहेत .
महिला विंग च्या अध्यक्षपदी डॉ.मोहिनी गानू सचिव पदी डॉ.राजश्री सावंत तर विविध सेवेच्या पदावर डॉ.याडकीकर डॉ.सोमवंशी गणपत डॉ.चेतन सारडा डॉ.दीपक गुगळे डॉ. ईरपतगिरे डॉ. मंगेश सेलूकर डॉ.परमेश्वर सूर्यवंशी डॉ.अशोक चव्हाण डॉ.अशोक नलेगावकर, डॉ.उमेश कानडे यांची निवड झाली आहे.
करोना संकटामुळे मावळते अध्यक्ष डॉ.विश्वास कुलकर्णी यांच्याकडून कोणतीही समारंभ न करता नवीन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.
यावेळी बोलताना डॉ.सुरेखा काळे यांनी करोना संकट पुन्हा वाढत आहे , त्यासाठी इंडियन इंडियन मेडिकल असोसिएशन शासनाला, समाजाला, आणि आरोग्य क्षेत्रातील कोरोना वॉरियर्स ना योग्य ती मदत करण्यास सदैव तत्पर असणार आहे असे प्रतिपादन केले .
येत्या वर्षात डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस आणि त्यांच्या मूलभूत प्रशासनावर काम डॉक्टर आणि रुग्ण यातील समन्वय आणि संतुलित जीवनाचे महत्व यावर प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी “आयएमए” च्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जातील हेही सांगितले .


 “आयएमए” चे आवाहन
-सर्वांनी शासनाच्या नियमानुसार लसीकरण करून घ्यावे
-नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये
-मास्कचा वापर करावा सामाजिक अंतर राखावे
-घरी आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांनी सूचनेचे तंतोतंत पालन करावे.
“आयएमए” चे नवीन कार्यकारिणी --डॉ.मंत्री सरिता, डॉ. बाहेती ,डॉ. जटाळ, डॉ.चिंते, डॉ. निसाळे , डॉ.जमादार, डॉ.गोपाळराव पाटील, डॉ.कुकडे सर, डॉ.अजय जाधव ,डॉ.भराटे, डॉ.सुधीर देशमुख ,डॉ.राम पाटील ,डॉ.रमेश  भराटे ,डॉ.सुधीर देशमुख, डॉ.राम पाटील, डॉ.गिरीश मैंदरकर, डॉ.विठ्ठल लहाने, डॉ.भातांब्रे या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


--
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या