सात कोटी नागरीकांना रोखीत मदत करुन टाळेबंदी जाहीर करणारा जबाबदार मुख्यमंत्री

 सात कोटी नागरीकांना रोखीत मदत करुन 

टाळेबंदी जाहीर करणारा जबाबदार मुख्यमंत्री ! 

----------  ------- ---------  -------  --------- -------





  पोपटावानी मचमच बोलता येत नाही उद्धवजींना . संवादात प्रामाणिकता असते , बेगडीपणा नसतो .जे असेल ते सरळ.राजकारणात थोडीशी लबाडी असावी लागते पण तीही मुख्यमंत्रीजी कडे नाही .देशात लांडी लबाडी आणि खोटारडेपणाची सुनामी आली असतांना , हा मनुष्य इतका प्रामाणिक कसा ? असा प्रश्नही पडतो.प्रसंगी शरद पवार एखादी राजकीय लबाडी करतील पण उद्धवजी नाही .येतच नाही त्यांना खोटारडे पणा .कांही मंडळी महाराष्ट्राचे खाऊन गुजरातचे गुण गातात.मदत वगैरे दिल्लीला पाठवीतात.इथली संपूर्ण व्यवस्था उध्वस्त करुन गिरणगावही गुजरात चरणी अर्पण करु पहातात.माञ उद्धवजी इथल्या गवताच्या काडीचेही रक्षण करतात.

कोरोना काळात उद्धवजी , आपल्या निवासस्थानी बसून राज्याची संपूर्ण सुञे हलवतात.संपूर्ण राज्यावर लक्ष ठेवतात.मिनिटा मिनिटाचे अपडेट घेतात.मुख्यमंत्री बाहेर पडले तर गर्दी होते , यंञणेवर ताण पडतो , अकारण राज्याचे पैसे खर्च होतात , असे घडू नये यासाठी उद्धवजी , एका जागेवरून बसून राज्याचा गाडा हाकतात.शिवाय लोकांनी घरा बाहेर पडू नये असा संदेश ते स्वतः अमंल करुन देतात.माञ येडझवे बेवडे त्यांना नावे ठेवतात.खास करुन महाराष्ट्रातील तुपाळचाळ चोमड्या जीभेने उद्ववजींना अद्वातद्वा बोलत राहते.इथेही कांही फरक पडत नाही , लोकप्रियतेच्या सर्वेत उद्धवजी आदरणिय फडणवीस साहेबांच्या खूप पुढे राहतात.खूप म्हणजे खूप बरं का ! फडणवीसजी 20% पुढे जात नाहीत तीथे उद्धवजी 80 ? असो.

आज रात्री पासून आपल्या जबाबदार मुख्यमंञ्यांनी पंधरा दिवसाची टाळेबंदी जाहीर केली .अशी टाळेबंदी जाहीर करतांना कोणाची उपासमार होणार नाही ,कोणाची गैरसोय होणार नाही , याची काळजी घेतली.गोर गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या राज्यातल्या जवळपास सात कोटी जनतेला , किमान दोन महिने पुरेल ऐवढी मदत धान्य आणि रोखीच्या स्वरुपात केली .जिल्हाधिकार्यांच्या खात्यावर आपतकालिन नीधी म्हणून 3300 कोटी रुपये टाकले.सरकारी मदतीवर आयुष्य जगणाऱ्या लोकांना नेहमी पेक्षा अधिक पैसे दिले.आरोग्य सुविधेसाठी नव्याने आर्थिक तरतुद केली .घरेलू कामगार ,फेरीवाले ,रिक्षा चालक ,आदीवाशी ,बांधकाम मजूर ,अशा सर्व घटकांना मदत करण्यासाठी आर्थिक नियोजन केले .दोन महिन्यासाठी साधारण सात हजार कोटी रुपये राज्यातील जनतेसाठी खर्च करण्याचा निर्णय मुख्यमंञ्यांनी जाहीर केला .आणि सक्त अमंलबजावणीचे आदेश जारी केले .टीव्ही समोर येऊन ' आज रात 12 बजेसे ' न म्हणता , तब्बल दहा दिवस विचार आणि नियोजन करुन लाँकडाऊन जाहीर केले .लाँकडाऊन करणे गरजेच होते.त्याशिवाय कोरोना संसर्ग चेन तुटणारी नव्हती .अत्यंत कडवट पण जबाबदारीपूर्ण निर्णय मुख्यमंञ्यांनी घेतला.

राज्यातला प्रत्येक शहाणा मनुष्य ऊद्धवजींच्या या भूमिकेचे स्वागतच करीत आहे.पण बाळुत्यातच बिघडलेले , अति तुपाने ओगळलेले, तुपाळचाळीतले तुरेराव लाँकडाऊनला नावे ठेवताहेत.कांही गाढवांना तर म्हणे उद्धवजींचे भाषणचं कळले नाही .कळणार कसं , त्यासाठी कष्टाची भाकरी खावी लागते.गरीबीचे चटके सोसावे लागतात.मातीत राबावे लागते.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या राज्यावर प्रेम असावे लागते.इथल्या मातीशी नाळ असावी लागते.शिवाय समस्त बहूजनांच्या हिताचे स्वप्नं उरी असावे लागते.

एक माञ खरे , ऊद्धवजींना पोपटा सारखे मिटूमिटू बोलताच येत नाही.आपले देवेंद्रजी बघा कसे बोलतात ?  आपले पंतप्रधान बघा कसे ठोकून देतात ? आपले सोमय्या बघा , बोलता येत नाही तरी सर्व शक्ती एकवटून आपली भूमिका मांडतात ? चंद्रकांत दादा बघा , दरेकरजी बघा ; आणि हो ते राणे साहेब , त्यांचे सुपूञ , त्या चिञामाय बघा , कशा बोलतात .पण उद्धवजींना बोलताच येत नाही .मनमोहनजी तर मौनी बाबाच.पण जगात सर्वश्रेष्ठ अर्थव्यवस्था ठेवली त्यांनी .आपल्या मुख्यमंञ्यांचेही असेच आहे.घरात बोलल्या सारखेच बोलतात.नाटक नौटंकी त्यांना येतच नाही .मला वाटतं ऊद्धवजींना महाराष्ट्र हे आपले कुटूंब आहे असेच वाटत असावे.आणि कुटूंबात कुटुंब प्रमुख जेवढ्या जबाबदारीने बोलतो वागतो , तेवढेच उद्धवजी बोलत वागत असावेत.पण तुपाळचाळीच्या कानाची खाज कोणी जिरवायची ? हा मोठा प्रश्न आहे.ती जबाबदारी महाराष्ट्रातील बहुजनांची लेकरं खाञीने पूर्ण करतील आणि करीत आहेत याचा मला विश्वास आहेच.अधूनमधून मी असतोच !

                                --- राजू पाटील , औसा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या