विद्यार्थ्यांना शिक्षण शिकविण्यासाठी पालकांनी जबाबदारी पार पाडावी विलास तपासे
आज बेलकुंड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तथा पत्रकार विलास तपासे म्हणाले की बेलकुंड हे गाव मजूराचे गाव म्हणून ओळखले जाते. शिक्षण शिक्षण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे त्यामुळे शाळेकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे आपला मुलगा शाळेत जातो अभ्यास करतो याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांला वेळोवेळी मार्गदर्शन करुण गावाचे व शाळेचे नाव वाढविले पाहिजे आज बेलकुंड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजमंदिरासमोर प्रभाकर सोनवते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरपंच विष्णु कोळी उपसरपंच सचिन पवार माजी सरपंच कोंडाबाई कांबळे सोमनाथ कांबळे ग्रामसेवक विकास फडणवीस ग्रामपंचायत सदस्य भागिरथी वगरे अजिंक्य अपसिंगेकर गोविंद वगरे बालिका पठाण सतिश गायकवाड गोविंद वाघमारे पोलिस पाटील व्यंकट साळुंके आशोक जाधव देविदास कांबळे मनोहर कांबळे आदी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.