सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औसा पालिकेतर्फे थकित उपदान

 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औसा पालिकेतर्फे थकित  उपदान 





औसा प्रतिनिधी औसा  नगर पालिकेतुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सेवानिवृत्ती काळात कुटुंबीयांची अडचण होऊ नये म्हणून नगराध्यक्ष डॉ .अफसर शेख आणि मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी एका महिन्यात दोन सेवानिवृत्ती वेतन देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान महिन्यात दिलासा दिला. तसेच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी औसा  नगरपालिकेच्या नऊ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तीन वर्षापासून उपदानाची थकीत असलेली रक्कम 20 लाख 35 हजार 468 रुपये दिले. सेवानिवृत्तीनंतर कर्मचार्‍यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन थकीत उपदानाची रक्कम देऊन पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची होत असलेली गैरसोय संघटनेचे अध्यक्ष आत्माराम बनसोडे यांच्या प्रयत्नाने दूर झाली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी व  नगरपालिका  कर्मचारी संघटनेचे औसा तालुका अध्यक्ष आत्माराम बनसोडे यांनी पालिका प्रशासनास धन्यवाद दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या