औसा नगरपालिका येथे कर्मचाऱ्यांना कोरोना होऊन गेला का हे पाहण्यासाठी कोरोना प्रतिकार शक्तिची तपासणी मोहीम
औसा मुख्तार मणियार
औसा नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना होऊन गेला का हे पाहण्यासाठी कोव्हिड -19 बॉडी टेस्ट कोरोना प्रतिकारशक्ती तपासणी मोहीम शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2019 रोजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली कोरोना विषाणूचा संकटकाळात नगर परिषदेतील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती तपासणी महत्त्वाचे आहे त्यासाठी एफडीए मान्यताप्राप्त मेट्रोपोलिस हेल्थ सर्व्हिसेस अंतर्गत इनर हेल्थ या मुंबई येथील प्रयोगशाळेच्या तज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक यांनी शुक्रवारी औसा नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या शरीरातील तापमान व रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहे एकूण 19 कर्मचाऱ्यांची आज तपासणी करण्यात आली 30 एप्रिल रोजी तपासणीनंतर काही कर्मचाऱ्यांना पूर्ण होऊन ते दुरुस्त झाले असून त्यांनी त्यांना त्याची माहिती नाही असे सांगण्यात आले त्यामुळे वयोमानानुसार त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे अशा कर्मचाऱ्यांना कोरोना होऊन गेला आहे तरी त्यांना काम करीत असताना पूर्ण प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेणे आवश्यक असल्याचे संचालक सद्दाम शेख यांनी सांगितले कोरोना विषाणू मुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली असून नगरपरिषद कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारशक्ती तपासणी तपासली त्याप्रमाणेच हा उपक्रम शहरात राबविण्यात येणार असून नागरिकांचीही कोव्हिड-19 रोगप्रतिकारशक्ती तपासण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष व मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.