कर्नाटक व महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या*एकंबा गावात डॉ बाबासाहेब* *आंबेडकर यांच्या पुतळा* *अनावरणाची जय्यत तयारी सुरू*

 *कर्नाटक व महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या*एकंबा गावात डॉ बाबासाहेब* *आंबेडकर यांच्या पुतळा* *अनावरणाची जय्यत तयारी सुरू*




   मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे  कर्नाटक व महाराष्ट्रातील  विविध मान्यवरांच्या हस्ते अनावरण होण्याची शक्यता


*विशेष प्रतिनिधी  लक्ष्मण कांबळे*


   बस्वकल्याण  तालुक्यातील    एकंबा हे गाव जेमतेम लोकसंख्या असलेले गाव  हे गाव तस पाहिलेतर कर्नाटक राज्यातील बस्वकल्याण तालुक्यात येत असून महाराष्ट्राच्या बॉर्डरवर वसलेले आहे.या गावात कन्नड व मराठी भाषा बोलली जाते. गेल्या आनेक वर्षा पासून या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया थाटामाटात होत असते.  जयंती बरोबरच गावकऱ्यांचे एक स्वप्न होते की आपण ही आपल्या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करावा म्हणून गावात राहणारे व गावातील काही तरुण हे मुंबई  पुणे येथे वास्तव्यास   राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते ते आज उदयास येत आहे. गेल्या एकवर्षा पासून पुतळा आणून ठेवण्यात आला होता .२०२० मध्ये देशात कोरोना संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. जण सामन्याचे जण जीवन विस्कळीत होऊन यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले .तरी या एकंबा गावच्या बौद्ध समाजाने शासनाला सहकार्य करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीला स्थगिती दिली होती . यंदा २०२१ मध्ये  मे महिन्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असून . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीसाठी भिम शक्ती तरुण मित्र मंडळाचे सर्वच कार्यकर्ते व वृद्ध मंडळी ,महिला , अतिउत्साही पणे  यासाठी परिश्रम घेत असून एकंबा गावत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभरतोय म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद  पहावयास मिळत आहे.असे भिम शक्ती तरुण मित्र मंडळांचे कार्यकर्त्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य कोष्याध्यक्ष तथा पोलीस टाईम्स चे उपसंपादक लक्ष्मण कांबळे यांचेशी भ्रमणध्वनी वर बोलत असताना माहिती दिली


*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरणाच्या वेळी गावातील  व शेजारी गावातील सर्व जनतेनी शांततेचे सहकार्य करावे असे ही 

*भिम शक्ती तरुण मित्र मंडळाच्या* *वतीने  विनंती केलेली आहे* .तसेच पुतळा अनावरणाची तारीख ही लवरच कळवण्यात येईल असे ते म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या